धनत्रयोदशी च्या रात्री दिव्यांचा केलेला हा खास उपाय आपल्याला बनवू शकतो मालामाल, होतील हे 10 फायदे

धनत्रयोदशीला विशेषतः भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्र अनुसार या दिवशी घरामध्ये दिवे लावल्याने आणि त्याचे काही खास उपाय केल्याने घरामध्ये समृद्धी येते. त्याच सोबत व्यक्तीला कार्यक्षेत्रात यश मिळते.

सगळ्यात पहिला दिवा धनतेरसच्या दिवशी यम देवताच्या नावाने प्रज्वलित केला पाहिजे. यास घराच्या मुख्य दरवाजावर दक्षिण दिशेला ज्योत करून ठेवावे. यामुळे नकारात्मकता दूर होते.

दुसरा दिवा पूजा करताना देवा समोर लावला पाहिजे. हा दिवा शुद्ध तुपाचा लावला पाहिजे यामुळे घरामध्ये समृद्धी येते.

धनतेरसच्या या खास दिवशी तिसरा दिवा घराच्या मुख्य दरवाजा समोर लावला पाहिजे. यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी येते. ज्यामुळे धन वृद्धी होते.

तसेच चवथा दिवा मुख्य दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला लावला पाहिजे यामुळे नजर दोष आणि वाईट शक्ती पासून संरक्षण होते.

पाचवा दिवा धनतेरसच्या दिवशी पिंपळाच्या झाडा खाली लावला पाहिजे. असे केल्याने कामात येणारे अडथळे दूर होतात.

धनतेरस च्या दिवशी एक दिवा आपण अडगळीच्या आणि बाथरूम मध्ये ठेवला पाहिजे. यामुळे नकारात्मकता दूर होते.

कचरा ठेवण्याच्या ठिकाणी देखील धनतेरसच्या दिवशी अंधकार असू नये त्यामुळे एक दिवा त्या जागी देखील अवश्य लावला पाहिजे.

धनतेरसच्या दिवशी तुळशी जवळ देखील एक दिवा अवश्य लावला पाहिजे. यामुळे घरामध्ये सुख-शांती राहते.

जर आपल्या घराला छत आहे म्हणजेच टेरेस आहे तर त्याच्या चारी कोपऱ्याला एक-एक दिवा लावला पाहिजे. असे केल्याने घरात राहणाऱ्यांची प्रगती होते.

स्वयंपाक घर आपल्या घराचा महत्वाचा भाग आहे. यामुळे स्वयंपाक घरात देखील एक दिवा लावला पाहिजे. यामुळे माता अन्नपूर्णा कृपा करते.

दिवाळीला केले जाणारे विशेष उपाय जाणून घ्यायचे असतील तर आमचे फेसबुक पेज मराठी गोल्ड लाईक करण्यास विसरू नका. तसेच पोस्ट शेयर करा ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ शकेल.