Breaking News

घराच्या भिंतीवर कधीच लावू नका या पशु-पक्षी आणि प्राण्यांचे फोटो

घराच्या भिंती आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी आपण त्यांच्यावर प्राणी आणि पक्ष्यांची छायाचित्रे लावतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतींवर कोणत्या प्रकारचे चित्र लावले पाहिजे याचा विचार केला गेला आहे. वास्तविक, काही प्राणी आणि पशु-पक्ष्यांच्या चित्रांचा घराच्या सुख-शांतीवर नकारात्मक प्रभाव पडतो.

गिधाडे, घुबड, कबूतर, कावळे, गरुड आणि बगळे अशा पक्ष्यांची फोटो किंवा चित्रे घरातल्या भिंतींवर ठेवू नयेत कारण ते आपल्या कुटूंबावर चांगली छाप सोडत नाहीत. असे मानले जाते की या पक्ष्यांची चित्रे लावणे घरासाठी शुभ नाही.

काहीवेळा आम्ही रोमांचक व्हावे म्हणून घरात साप इत्यादींचे फोटो घरात लावतो पण वास्तुशास्त्रानुसार साप किंवा त्यांच्यासारख्या प्राण्यांचे फोटो घरात ठेवू नये कारण यामुळे घरात नकारात्मक उर्जा येते आणि अशांती राहते. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद राहतात.

याशिवाय विनाशाशी संबंधित गोष्टी घरात लावण्याचे टाळले पाहिजेत, म्हणून महाभारताच्या युद्धाचा फोटो घरात लावू नये. युद्धाशी संबंधित चित्रांना पाहिल्याने स्वभावात उग्रता वाढते. ज्यामुळे कुटुंबात तणाव वाढतो.

वास्तुशास्त्रानुसार घरात बुडणार्‍या बोटीचा फोटो लावणे अशुभ मानले जाते. या प्रकारचा फोटो घरात नकारात्मक ऊर्जा आणतो, यामुळे घरात तणाव वाढतो.

चित्र कितीही सुंदर असले तरीही आपण ड्रॉईंग रूममध्ये वाहणार्‍या पाण्याचे चित्र कधीही ठेवू नये. वास्तुशास्त्रा अनुसार यामुळे पैशाचा अपव्यय होतो.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.