37 वर्षा नंतर दिवाळीला बनत आहे महासंयोग, या मुहूर्तावर करा माता लक्ष्मीचे पूजन, वर्षभर मिळेल अफाट धन

यावर्षी दिवाळी रविवारी आहे. रविवार  सूर्यदेवांचा दिवस  असतो. अश्यातच सूर्यदेवाची दिवशी, चित्रा नक्षत्र आणि अमावास्या असा महासंयोग पूर्ण 37 वर्षाने होत आहे. या योगाचे पूर्ण लाभ भक्तांना मिळणार आहेत. ते माता लक्ष्मीच्या कृपेचे पात्र होऊ शकतात. दिवाळीची रात्र वर्षातील सगळ्यात काळी म्हणजेच अंधकार असलेली रात्र असते. शास्त्रा नुसार दिवाळीला दिवे लावणे अनिवार्य आहे. विना दिव्यांची दिवाळी अपूर्ण आहे. दिवाळीला काही खास काम करून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न देखील करू शकता.

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे काम केलीच पाहिजेत

दिवाळीला घराची पूर्ण साफसफाई केलीच पाहिजे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. घराच्या मुख्य दरवाजाची चांगली साफसफाई केली पाहिजे. दरवाजाच्या समोर आपण चप्पल किंवा इतर पादत्राणे ठेवू नयेत. तसेच घराच्या बाहेर रांगोळी अवश्य काढली पाहिजे.

दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजा समोर हळदीचे पाणी शिंपडणे शुभ मानले जाते. हे घरामध्ये वाईट शक्तींना येऊन देत नाही आणि सोबतच पॉजिटीव्ह एनर्जी पसरवते. दिवाळीच्या दिवसात घराच्या स्वयंपाकघरात खरकटी भांडी सोडू नयेत. यामुळे दरिद्रता येते. तसेच स्वयंपाकघरात देखील एक दिवा आवश्य लावावा. यामुळे माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. आपल्याला वाटल्यास माता अन्नपूर्णाची पूजा करू शकता.

तसेच दिवाळीला माता लक्ष्मी समोर कमीत कमी पाच प्रकारचे फळ आवश्य ठेवावी. त्याच सोबत कोणतीही मिठाई जसे लाडू इत्यादी देखील ठेवू शकता. दिवाळीच्या दिवशी आपण सगळ्यांनी आपल्या घरातील धन आणि दागिन्यांची पूजा केली पाहिजे. यामुळे वर्षभर घरामध्ये बरकत राहते. माता लक्ष्मीला कमळ पुष्प आणि गणपतीला दुर्वा अर्पण करावा.

दिवाळीला हि कामे चुकूनही करू नयेत.

दिवाळीच्या दिवशी घरामध्ये अस्वच्छता पसरवू नये. यामुळे निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही. तसेच यागोष्टीची देखील काळजी घ्यावी कि दिवाळीला आपल्या कुटुंबियांच्या सोबत तसेच इतर कोणाही सोबत वादविवाद होणार नाहीत. वादविवाद आणि भांडण नकारात्मकता पसरवतात. आणि तसेही आपल्याला माता लक्ष्मीचे पूजन शांत आणि स्वच्छ मनाने करायचे आहे.

कधीही महिलांना वाईट वागणूक देऊ नये. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये महिलांना आपण देवीचे रूप मानतो. त्यामुळे त्यांना दुखावणे म्हणजे साक्षात माता लक्ष्मीला दुखावण्या सामान असते हे विसरू नये.

पूजेचा मुहूर्त

दिवाळीला लक्ष्मी पूजनाचे विशेष महत्व असते. त्यामुळे आपण ही पूजा एका योग्य वेळी म्हणजेच मुहूर्तावर केली पाहिजे. यामुळे आपल्याला लाभ होईल. यावेळी दिवाळी 27 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी सुरु होत आहे आणि 28 ऑक्टोबर 2019 ला सकाळी 9 वाजून 8 मिनिटा पर्यंत आहे. माता लक्ष्मीचे पूजन करण्याची उत्तम वेळ (मुहूर्त) 27 ऑक्टोबर 2019 संध्याकाळी 6 वाजून 42 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 12 मिनिटा पर्यंत आहे. हा पूर्ण कालावधी 1 तास 30 मिनिटांचा आहे.