दिवाळीच्या रात्री या 5 जागी अवश्य लावा दिवा, मिळते माता लक्ष्मीची विशेष कृपा

यावेळी दिवाळी 27 ऑक्टॉबर रोजी आहे. दिवाळीचा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. दिवाळीला दीपावली देखील बोलले जाते. असे मानले जाते कि दिव्यांची रोषणाई असलेल्या या रात्री माता लक्ष्मी भ्रमण करण्यास निघते आणि आपल्या भक्तांना आनंद वाटते. दिवाळीचा सण हिंदू कैलेंडर प्रमाणे ठरते आणि हि साधारणतः ऑक्टॉबर किंवा नोव्हेंबर महिन्यात असते.

दिवाळी बद्दलची सगळ्यात लोकप्रिय कथा प्रभू राम यांच्या बद्दलची आहे. रावणाचा वध केल्या नंतर आणि चौदा वर्षांचा वनवास संपल्या नंतर राजा राम अयोध्येला परतले होते. प्रभू रामचंद्र यांच्या परत येण्याच्या आनंदा मध्ये लोकांनी पूर्ण अयोध्या नागरी तसेच आपले घर दिव्यांच्या प्रकाशा मध्ये उजळून टाकली होती. त्या दिवसापासून दिवाळी म्हणजेच प्रकाशाचा उत्सव साजरा केला जातो.

असे मानले जाते कि माता लक्ष्मी दिवाळीच्या रात्री पृथ्वी वर भ्रमण करण्यास निघते आणि या दिवशी माता ज्या व्यक्तीच्या घरामध्ये निवास करते. त्यांना कधीही पैश्यांची कमी होत नाही. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी लोक आपल्या घराला विविध प्रकारच्या दिव्यांनी सजवतात. पण काही लोकांना हे माहित नसते कि घरामध्ये कोठे कोठे दिवा लावला पाहिजे. काही खास जागी दिवा लावल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. चला तर जाणून घेऊ दिवाळीच्या दिवशी घरा मध्ये कोठे कोठे दिवा लावला पाहिजे.

या 5 जागी अवश्य लावा दिवा

दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खाली एक दिवा अवश्य लावला पाहिजे. मानतेच्या अनुसार पिंपळाच्या झाडामध्ये देवतांचा वास असतो. त्यामुळे येथे दिवा लावणे शुभ मानले जाते.

असे सांगितले जाते कि दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचे आगमन घरा मध्ये होते. त्यामुळे दिवा लावताना  मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवा लावला पाहिजे.

जर आपल्या घराच्या आजूबाजूला एखादे मंदिर असेल तर दिवाळीच्या दिवशी तेथे जाऊन एक दिवा लावला पाहिजे. असे केल्याने पूर्ण वर्ष माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते.

जर आपल्या घराच्या आजूबाजूला एखादी निर्जन स्थळ असेल तर तेथे जाऊन एक दिवा अवश्य लावा. जर शक्य असेल तर एखाद्या चौकात दिवा लावा.

जर आपल्या घराला अंगण असेल तर तेथे देखील दिवा लावणे विसरू नका, घराच्या अंगणा मध्ये दिवा अवश्य लावला पाहिजे. अंगणा मध्ये दिवा लावल्याने आपले दुर्भाग्य आपल्या पासून कोसो दूर निघून जाते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. घराच्या अंगणा मध्ये तुपाचा दिवा लावा आणि तो रात्रभर जळत राहील याची काळजी घ्या.