dharmik

शुभ लाभ होण्यासाठी धनतेरसच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या 3 वस्तू, जाणून घ्या काय खरेदी करावे

धनत्रयोदशी दिवाळीच्या दिवसातील एक महत्वाचा दिवस आहे. यादिवशी प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी काही ना काही आवश्य खरेदी करतात. जेथे श्रीमंत लोक या दिवशी सोने चांदी इत्यादी खरेदी करतात तर सामान्य लोक या दिवशी भांडी खरेदी करतात. असे मानले जाते कि धनतेरसच्या दिवशी सामान खरेदी केल्याने घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी होत नाही. चला जाणून घेऊ या लेखा मध्ये तुमच्यासाठी काय खास माहिती आहे.

धनतेरसह्या दिवशी तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी जे जाणून घेण्याची गरज आहे कि काय खरेदी करणे शुभ आहे आणि काय खरेदी करणे अशुभ आहे. खरतर धनतेरसच्या दिवशी तुम्ही अशुभ वस्तू खरेदी केली तर तुमच्या घरात समस्या येऊ शकतात. याच्या विरुध्द तुम्ही शुभ वस्तू खरेदी केली तर घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल. यासाठी धनतेरसच्या दिवशी तुम्ही आपल्या कुटुंबासाठी शुभ वस्तू खरेदी करा ज्यामुळे तुम्ही त्यांना आनंद देऊ शकता.

धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी करू नका

कुटुंबामध्ये सुखशांती राहण्यासाठी धनतेरसच्या दिवशी खालील वस्तू खरेदी करू नका.

लोखंड

धनतेरसच्या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करू नका. असे मानले जाते कि लोखंड खरेदी केल्यामुळे घरामध्ये शनीचा वास होतो आणि तुमचे सर्व होणारी कामे बिघडू लागतात.

काच

धनतेरसच्या दिवशी काचेच्या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये फूट पडू शकते. यासाठी या दिवशी चुकूनही तुम्ही काचेच्या वस्तू खरेदी करू नका अन्यथा तुमच्या घर परिवारा मध्ये फूट पडू शकते, जे तुमच्यासाठी चांगले राहणार नाही.

टोकदार वस्तू

धनतेरसच्या दिवशी टोकदार वस्तू जसे चाकू, सुरी किंवा हत्यार इत्यादी खरेदी करू नये. अन्यथा घरामध्ये नेहमी भांडण तंटे होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला यावस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे.

धनतेरसच्या दिवशी खरेदी करा या वस्तू

धनतेरसच्या दिवशी घर परिवारात सुखशांती आणि समृद्धी येण्यासाठी खालील वस्तू खरेदी करू शकता.

गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती

धनतेरसच्या दिवशी गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती खरेदी केली पाहिजे. यामुळे घरामध्ये धनाची कमी होत नाही आणि सोबतच माता लक्ष्मीची कृपा पूर्ण कुटुंबावर राहते.

शंख

कुटुंबामध्ये शांती आणि सकारात्मक उर्जा राहण्यासाठी धनतेरसच्या दिवशी तुम्ही शंख आवश्य खरेदी केला पाहिजे आणि दिवाळीच्या पूजेच्या वेळी यास आवश्य वाजवला पाहिजे. यामुळे घरामध्ये सगळ मंगलमय होते.

कुबेराची प्रतिमा खरेदी करणे

धनतेरसच्या दिवशी कुबेराची प्रतिमा खरेदी करून त्याची पूजा अर्चना केल्याने घरामध्ये कधीही पैश्यांची कमी होत नाही आणि कुबेराची कृपा तुमच्या कुटुंबावर राहते.

झाडू खरेदी

धनतेरसच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी नवीन झाडू खरेदी केली पाहिजे आणि दिवाळीच्या दिवशी तिच्याने सफाई केली पाहिजे. असे केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button