दिवाळीच्या रात्री घुबड दिसले तर समजावे आपल्या घरी माता लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे, या 3 जीवांचे दिसणे देखील असते शुभ

0
28

अगदी काही दिवसाच्या अंतरावरच दिवाळी आली आहे. यावर्षी दिवाळी 27 Oct रोजी आहे. दिवाळीसाठी लोक आता पासूनच आपल्या घरामध्ये साफसफाई करण्यास लागले आहेत. सगळ्यांना वाटते कि दिवाळी मध्ये त्यांच्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ दिसला पाहिजे. कदाचित आपल्या मना मध्ये देखील प्रश्न आला असेल कि असे लोक का करतात? कारण हिंदू धर्माच्या मान्यते अनुसार माता लक्ष्मी त्याच घरामध्ये प्रवेश करते ज्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ असेल. तसेच असे देखील मानले जाते कि दिवाळीच्या रात्री जे घर प्रकाशाने चमकत असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते.

पण माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन झाले आहे किंवा नाही हे कसे समजू शकेल? याबद्दल ज्योतिषशास्त्रा मध्ये 4 संकेत सांगितले आहेत. ज्यामुळे आपल्याला समजू शकते कि माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश केला आहे.

हे संकेत कोणते आहेत या बद्दल आपल्या मना मध्ये देखील उत्सुकता वाढली असेल. तर चला जाणून घेऊ दिवाळीच्या रात्री कोणकोणते 4 जीव दिसल्यास माता लक्ष्मीचे आगमन झाल्याचे संकेत मानले गेले आहेत.

घुबड दिसणे

दिवाळीच्या रात्री घुबड दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीचे वाहन घुबड कोठेही दिसले तर समजावे कि माता लक्ष्मीची आपल्यावर विशेष कृपा आहे. आपण असे समजू शकता कि येणाऱ्या दिवसा मध्ये आपली आर्थिकस्थिती मजबूत होणार आहे. योगायोगानेच घुबड दिसणे शुभ मानले जाते.

उंदीर दिसणे

तसेतर उंदीर अनेक घरामध्ये धुमाकूळ घालतात. पण दिवाळीच्या रात्री जर घरामध्ये कोठेही उंदीर दिसला तर समजावे कि हे माता लक्ष्मीच्या रूपाने आला आहे. उंदीर दिसण्याचा अर्थ पूर्ण वर्ष आपल्या घरामध्ये सुख-शांती आणि समृद्धी राहील. येणाऱ्या काळात आर्थिक समस्या बरीचशी दूर होईल. यास सौभाग्य संकेत देखील मानले जाते.

चिचुंदरी दिसणे

चिचुंदरी हि दिसण्यास जवळपास उंदरा सारखी असते. पण आकाराने या मोठ्या असतात. दिवाळीच्या दिवशी चिचुंदरी दिसणे हा संयोग नाही. या रात्री जर चिचुंदरी दिसली तर हे आपल्या भाग्य उदय चे संकेत आहेत. यांच्या दिसण्याने समजावे कि आपण अत्यंत भाग्यशाली आहात आणि धन संबंधी आपल्या सगळ्या समस्या संपणार आहेत.

पाल दिसणे

घराच्या भिंतीवर पाल दिसणे हे इतर दिवशी सामान्य आहे पण दिवाळीच्या रात्री पाल दिसणे शुभ संकेत आहेत. आपण जर लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल कि दिवाळीच्या दोन-तीन दिवस अगोदरच पाल आपल्याला घरातून दिसेनाशी होते. त्यामुळे जर दिवाळीच्या दिवशी जर आपल्याला घरा मध्ये दिसली तर माता लक्ष्मीचे आगमन झाल्याचे संकेत आहेत. दिवाळीच्या रात्री पाल दिसण्याचा अर्थ पूर्ण वर्ष येणाऱ्या समस्ये पासून सुटका मिळते.