दिवाळी येण्या अगोदर घरा बाहेर करा या 10 वस्तु, तेव्हाच माता लक्ष्मी करतील घरा मध्ये प्रवेश

0
26

हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण दिवाळी असतो असे मानले जाते. या सणाच्या तयारीसाठी आपण सगळे फार पूर्वी पासूनच लागतो, घराची साफसफाई आणि रोषणाई करतो ज्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश कराव्यात आणि आपल्या सगळ्या समस्यांना त्यांनी दूर कराव्यात अशी आपली अपेक्षा असते. असे मानले जाते कि माता लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत नाही जेथे अस्वच्छता आणि अशुभ वस्तू असतात. माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत आवडते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्र अनुसार दिवाळीला घरा मध्ये तुटक्याफुटक्या वस्तू नसाव्यात. चला जाणून घेऊ दिवाळीला साफ सफाई करताना कोणत्या वस्तूंना घराच्या बाहेर काढले पाहिजे.

फुटलेल्या काचेच्या वस्तू

जर आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये फुटलेला आरसा आहे किंवा आपल्या खिडकीची काच फुटलेली आहे तर त्यास त्वरित घराच्या बाहेर फेकावे आणि त्याजागी नवीन काच लावावी. घरा मध्ये फुटलेला किंवा चीर पडलेला आरसा ठेवणे अशुभ मानले जाते.

खराब इलेक्ट्रिक वस्तू

जर आपल्या घरामध्ये काही इलेक्ट्रिक सामान खराब किंवा नादुरुस्त झाले असेल तर त्यास रिपेयर करून पुन्हा वापरण्या लायक करावे किंवा दिवाळीच्या अगोदर घराच्या बाहेर फेकण्यास विसरू नये. खराब झालेल्या या इलेक्ट्रिक वस्तू आपल्या आरोग्य आणि भाग्य या दोघानसाठी अशुभ ठरतात.

भग्न मूर्ती

कधीही चुकूनही कोणत्याही देवी किंवा देवतेची खंडित किंवा भग्न झालेली मूर्ती किंवा फोटो आपल्या पूजे मध्ये ठेवू नये. दुर्भाग्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या अगोदर असे फोटो किंवा मूर्ती एखाद्या स्थानी विसर्जित करावी.

छत ठेवा स्वच्छ आणि सुंदर

या दिवाळीच्या अगोदर आपल्या घराचे छत स्वच्छ करा आणि अगोदर पडलेला कचरा किंवा वापरात नसलेल्या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्याव्यात.

बंद पडलेलं घड्याळ घराबाहेर करा

वास्तू अनुसार घड्याळ आपल्या प्रगतीचे प्रतीक आहे. त्यामुळे बंद अवस्थेतील घड्याळ आपल्या प्रगतीसाठी बाधक ठरू शकते. त्यामुळे जर घरा मध्ये खराब घड्याळ असेल तर त्यास दिवाळीच्या अगोदर दुरुस्त करून चालू करा किंवा घराबाहेर फेकून द्या.

जुने चप्पल-बूट

दिवाळीच्या अगोदर साफ-सफाई करताना जुने चप्पल-बूट ज्यांना आपण वापरत नाहीत, त्यांना घरा बाहेर करण्यास विसरू नये. फाटके-मोडके जुने चप्पल-बूट घरामध्ये नकारात्मकता आणि दुर्भाग्य घेऊन येतात.

मोडलेली भांडी

कधीही मोडलेल्या भांड्यांचा वापर नाही केला पाहिजे. या दिवाळीला आपण असे भांडी ज्यांचा आपण दीर्घकाळा पासून वापर केला नाही किंवा ते मोडले आहेत, त्यांना घरा बाहेर काढा. हे घरा मध्ये भांडणाचे कारण बनतात.

मोडलेल्या फोटो फ्रेम्स

जर घरामध्ये मोडलेल्या किंवा फुटलेल्या फोटो फ्रेम्स किंवा फोटो असतील तर त्यांना घरा बाहेर काढा. वास्तू अनुसार तुटलेले फोटो घराचे वातावरण प्रभावित करतात.

घराचे फर्निचर

वास्तुशास्त्र अनुसार घरामध्ये मोडके किंवा तुटलेले फर्निचर ठेवणे अशुभ मानले जाते. घरातील फर्निचर एकदम चांगल्या अवस्थेत असावे. वास्तू अनुसार फर्निचर मधील तोडके-मोडके पण वाईट प्रभाव करते.

फुटलेला आरसा

वास्तुशास्त्र अनुसार फुटलेला आरसा घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो.