Breaking News

आमिर खानमुळे अनेक तास बाथरूम बंद करून रडत होती दिव्या भारती, अभिनेत्री ने स्वतः सांगितली होती घटना

आमिर खान 54 वर्षांचा आहे. आमिर खानचा जन्म 1 मार्च 1965 रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला. एकदा दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीने आमिर खानविषयी मोठा खुलासा केला. दिव्या भारतीने सांगितले होते की आमिर खानमुळे ती अनेक तासांपासून बाथरूममध्ये रडत होती. रिपोर्ट्सनुसार लंडनमधील एका शो दरम्यान दिव्या भारतीची वागणूक पाहिल्यानंतर आमिर खान त्यांच्यावर खूप चिडला होता. मात्र, जेव्हा दिव्या भारती यांना याबाबत विचारणा केली गेली होती, तेव्हा तिने असे सांगितले होते की आमीर खानने तिच्या अशा वागण्याबद्दल माफी मागावी. दिव्या भारतीनेही सांगितले होते की या शो दरम्यान तिने काही चूक केली होती, परंतु तिने लवकरच हे कव्हर केले होते.

दिव्या भारतीने आपली चूक लपविली असली तरीही आमिर खानच्या तीक्ष्ण डोळ्यांमुळे दिव्या भारतीची चूक लपवता आली नाही. असे म्हटले जाते की, दिव्या भारतीची चूक पकडल्यानंतर, आमीरने आयोजकांना दिव्या भारतीच्या ऐवजी जुही चावला कडून पार्मोर्मन्स करून घेण्यास सांगितले होते. याशिवाय आमिरनेही दिव्या भारतीसोबत काम करण्यास नकार दिला. दिव्या भारतीसोबत काम न करण्यासाठी आमिर खानने आपण थकलो असल्याचा बहाणा केला होता. त्यानंतर परिस्थिती पाहून सलमान खान दिव्या भारतीच्या समर्थनार्थ आला आणि सलमान खानने ‘दिव्य भारती’ बरोबर स्टेजवर जबरदस्त परफॉर्मन्स केला होता.

दिव्या भारती म्हणाली होती की त्या रात्री आमिर खानची वागणूक पाहून तिला खूप वाईट वाटले होते आणि बराच काळ ती बाथरूम बंद करून रडत राहिली होती. असे असूनही, दिव्या भारती शोमधून वॉकआउट झाली नाही. कारण या शोसाठी त्यांना आधीच पैसे मिळाले होते. एकीकडे दिव्या भारतीने आमिर खानच्या वागण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती, तर सलमानच्या या वागणूकीची खूप प्रशंसा झाली. ”एका मुलाखतीत दिव्य भारतीच्या आईने सांगितले की, आमिर खान मुळेच फिल्म ‘डर’ मध्ये त्यांची मुलगी दिव्या भारतीच्या जागी जुही चावला अभिनेत्री म्हणून घेतली गेली होती.

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये दिव्या भारती ही कदाचित एकमेव अभिनेत्री आहे जिने आपल्या करियरच्या पहिल्याच वर्षी लागोपाठ 12 फिल्म मध्ये काम केले आणि तिचे सर्व फिल्म सर्व फिल्म हिट झाले होते. पण असे असले तरी नियतीला काही वेगळेच मान्य होते कारण करियरच्या दुसऱ्याच वर्षी दिव्या भारतीने या जगाचा निरोप घेतला. दिव्य भारती यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी झाला होता. वयाच्या 19 व्या वर्षीच त्यांचे निधन झाले. आजपर्यंत त्याच्या मृ’त्यूमागील कारण स्पष्ट झालेले नाही. वर्ष 1992 मध्ये दिव्या भारती हिने ‘विश्वात्मा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. तसे, दिव्याने यापूर्वी काही तेलगू चित्रपटांमध्ये काम केले होते. विश्वात्मा चित्रपटात काम केल्यानंतर दिव्याने एकापाठोपाठ 10 आणखी हिंदी चित्रपट केले. ज्यामध्ये शोला और शबनम, दिल का क्या कसूर, जान से प्यार, दीवाना, दिल आशना है आणि गीत या फिल्मचा समावेश होता. दिव्या भारतीचा चित्रपटातील अभिनय आणि नृत्यकला पाहून ती श्रीदेवी नंतर बॉलीवूड मधील पुढील लेडी सुपरस्टार झाली असती असे अनेकांना वाटत होते. आपल्याला दिव्या भारतीचा सर्वात जास्त आवडलेल्या फिल्मचे नाव कमेंट मध्ये लिहा.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.