astrology

घराच्या समोर खेळताना दिसला कुत्रा तर होते काही खास, वाचा कुत्र्यांच्या संबंधीत काही मान्यता

हिंदू धर्मामध्ये गाय, मांजर, कुत्रा आणि दुसऱ्या प्राण्यांच्या संबधित अनेक मान्यता आहेत, कुत्रा हा आपले आराध्य दैवत खंडोबा यास प्रिय आहे. तसेच इतर प्राण्यांच्या बाबतीत देखील काहीना काही विशेषता आहेत.  परंतु कुत्र्याच्या संबंधित आपल्याकडे काही मान्यता प्रचलित आहेत, जसे कि त्याचे हावभाव आणि वागणुकी वरून शकून-अपशकून जोडलेले आहेत.  आज येथे काही अश्याच प्रचलित मान्यता बद्दल माहिती पाहूया..

खरतर प्राण्यांना सूक्ष्म जगाच्या हालचाली म्हणजेच परलौकिक शक्तींना ओळखण्याची क्षमता असते जी सामान्य माणसाकडे नसते.  प्राणी आपल्या या क्षमतेमुळे सूक्ष्म जगातील हालचाली ओळखून त्यास अनुरूप व्यवहार करतात आणि त्यामुळे प्राण्यांच्या हालचाली समजल्या तर भविष्यात होणाऱ्या  चांगल्या-वाईट घटनांचा अंदाज लावला जाऊ शकतो. या विश्लेषणच्या आधारावर प्राणी व्यवहाराच्या संबंधित वेगवेगळ्या मान्यता आहेत.. विशेषतः कुत्र्यांच्या बाबतीत अश्या अनेक मान्यता आहेत.

शकुन शास्त्रा अनुसार जर कुत्रा अचानक जमिनीवर आपले डोके रगडायला लागले आणि असे नेहमी करायला लागला तर त्याजागी धन गाढलेले असण्याची शक्यता आहे.

तर घराच्या समोर एखादा कुत्रा खेळताना दिसला तर हा शुभ संकेत मानावा, मान्यते अनुसार घरातील वैवाहीकांना संतान प्राप्तीचे योग आहेत.

जर कुत्रा आपल्या तोंडामध्ये माणसाच्या शरीराचा एखादा अंग घेऊन आला तर यास देखील अत्यंत शुभ मानले जाते, मान्यते अनुसार तुमचे जमिनीच्या संबंधित विवाद समाप्त होऊ शकतात आणि भूमी किंवा संपत्तीचे लाभ प्राप्त होऊ शकतात.

सोबतच कुत्रा तोंडामध्ये मांस घेऊन येणे देखील शुभ शकुन मानले जाते. यामुळे धन लाभ होण्याचे संकेत मिळतात. तुम्हाला एखादी जुनी उधारी परत मिळू शकते, किंवा व्यापारा मध्ये अचानक मोठा फायदा होऊ शकतो.

रस्त्यातून चालताना कुत्रा डाव्याबाजुने सोबत चालण्यास लागला तर हे सुंदर स्त्री किंवा धन प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. पण जर उजव्या बाजून चालत असेल तर हे चोरी किंवा इतर मार्गाने धन हानी होण्याचे संकेत आहेत.

परंतु जर तुम्ही प्रवासाला निघत असाल आणि त्यावेळी कुत्रा तुमच्या पायाला आपले अंग खाजवत असेल तर हा अपशकून मानला जातो. अश्या वेळी तुम्ही ज्या कारणासाठी प्रवासाला निघाले आहेत त्या मध्ये यश मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे प्रवास स्थगित करणे योग्य राहते.

याच सोबत रात्री कुत्र्याचे रडणे देखील अपशकुन मानले जाते, असे मानले जाते कि घराच्या स्वामीवर एखादे मोठे संकट येऊ शकते, किंवा घरामध्ये होणाऱ्या अनिष्ट घटनांचे हे संकेत आहेत.

शकुन शास्त्रानुसार एखादी रुग्णाच्या समोर कुत्रा आपली शेपटी किंवा हृदय नेहमी चाटणे मोठा अपशकुन असतो, यामुळे त्या रुग्णाची लवकरच मृत्यू होण्याची शक्यता असते.


Show More

Related Articles

Back to top button