food

रताळ्याचे हे औषधी गुण तुम्हाला माहीत नसतील, पहा याचे अप्रतिम फायदे

रताळे हे बटाट्या सारखेच जमिनीखाली येते हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही कदाचित याकडे फक्त उपवासा मध्ये खाण्याचा एक पदार्थ म्हणून पाहत असाल पण हे तुम्हाला सांगू इच्छितो की रताळे हे बटाट्या पेक्षा जास्त पोष्टिक असते. यामध्ये 16 टक्के स्टार्च आणि 4 टक्के शर्करा असते. रताळ्यामध्ये विटामिन ‘ए’, कैल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटाशियम, लोह आणि अल्प प्रमाणात विटामिन ‘सी’ असते. बटाट्याच्या तुलनेत रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, कैल्शियम, विटामिन ‘ए’ जास्त असते. चला पाहू रताळे काय फायदे देते.

रताळ्या मध्ये आयरन, फोलेट, कॉपर, मैग्निशियम, विटामिन इत्यांनी असते ज्यामुळे इम्यून सिस्टीम मजबूत होते. रताळे खाण्यामुळे त्वचेवर चमक येते आणि चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाही. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचे मध्ये कोलाजिन निर्माण करते ज्यामुळे तुम्ही नेहमी तरुण आणि सुंदर रहाल.

रताळ्या मध्ये डायट्रि फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असते. रताळे चवीने गोड असते. हे खाण्यामुळे रक्त वाढ होते, शरीर जाड होते तसेच हे कामशक्ती वाढवते. नारंगी रंगाच्या रताळ्यात विटामिन ए भरपूर प्रमाणात असते. रताळ्या मध्ये कैरोटीनॉयड नावाचे तत्व असते जे ब्लड शुगर नियंत्रित ठेवते. तसेच यातील विटामिन बी-6 डायबिटीक हार्ट डीजीज मध्ये फायदेशीर असते.

हे उच्च मात्रा असलेले स्टार्च फूड आहे ज्याच्या 100 ग्राम मध्ये 90 कैलोरीज असतात. हे खाण्यामुळे मधुमेह, हृदय रोग आणि संपूर्ण पण मृत्युकारक जोखीम कमी होते. हे आयुष्य वाढवणारे आणि उर्जा वर्धक असते. हे वजन कमी करण्यास मदत करते.

वांगी आणि रताळ्याची भाजी चांगली बनते. यांच्या एकत्रित सेवनामुळे याचा वायुकारक दोष कमी होतो.

जर तुमचे ब्लड शुगर लेवल काही ही खाण्यामुळे लगेच वाढत असेल तर.रताळे खाने फायदेशीर राहते. हे खाण्यामुळे ब्लड शुगर नेहमी नियंत्रित राहते आणि हे इन्सुलिन वाढू देत नाही.

रताळ्याला सावलीत सुकवून केलेले बारीक चूर्ण 3-5 ग्राम गरम दुधा सोबत घेतल्यामुळे प्रदर रोग मध्ये फायदा होतो.

रताळे रक्त वाढ करते आणि शरीराला शक्तिशाली बनवते. रताळे भाजून खाल्ले तर ते जास्त गोड लागते.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर रताळ्याचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी करू शकता. यांना उकळवून थंड होऊन द्या आणि नंतर मध मिक्स करून फेसपैक म्हणून चेहऱ्यावर लावा. वाटल्यास तुम्ही यात लिंबाचा रस पण मिक्स करू शकता. हा फेसपैक अर्धा तास चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवून घ्या.

रताळे विटामिन डी भरपूर देते. हे विटामिन दात, हाडे, त्वचा आणि नसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी उपयुक्त असतात. विटामिन ए देखील रताळ्या मध्ये भरपूर असते त्यामुळे रताळे खाण्यामुळे शरीराची विटामिन ए ची गरज 90 टक्के पूर्ण करते.

रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते. आयरनच्या कमतरतेमुळे शरीरात एनर्जी कमी होते, तसेच रोग प्रतिरोधक क्षमता प्रभावित होते आणि ब्लड सेल्सचे निर्माण व्यवस्थित होत नाही. रताळे आयरनची कमी भरून काढते.

रताळे पोटाशियमचा चांगला स्त्रोत आहे. हे नर्वस सिस्टीमची सक्रियता व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. सोबतच किडनी निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

तेलकट त्वचेसाठीच नाही तर कोरड्या त्वचेसाठी पण रताळे फायदेशीर आहे. जे त्वचेसाठी मॉश्चराइजर चे काम करते.उकळलेल्या रताळ्याट ओट्स आणि दही मिक्स करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवल्या नंतर स्क्रब सारखा वापर करा आणि कोमट पाण्याने धुवा.

जर तुमच्या केसांची वाढ होत नसेल तर रताळ्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल. यामध्ये बीटा कैरोटीन केसांच्या वाढीसाठी मदत करते.


Show More

Related Articles

Back to top button