या धनतेरस ला राशीनुसार काय खरेदी करणे आपल्यासाठी राहील शुभ

दिवाळीची सुरुवात धनतेरस ने होते. धनतेरस यावर्षी 25 ऑक्टोबर 2019 रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांग अनुसार यावर्षी कार्तिक महिन्याची कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 25 ऑक्टोबर रोजी आहे त्यानुसार धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस या दिवशी आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते कि या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता. या दिवशी काही ना काही खरेदी करण्याची परंपरा आहे जसे सोने-चांदी चे दागिने, भांडी, वाहन आणि झाडू इत्यादी. धनतेरस ला खरेदी केल्याने धन वृद्धी होते आणि सुख समृद्धी येते असे मानले जाते.

अशी मान्यता आहे कि धनतेरस ला वस्तू खरेदी केल्याने धन तेरा पटीने वृद्धिंगत होते. यादिवशी सगळे सुख-समृद्धी युक्त आणि चांगल्या आरोग्यदायी आयुष्याची कामना करत भगवान धन्वंतरी यांची पूजा करतात. तसेच घराच्या प्रवेशद्वारात दिवा प्रज्वलित करावा. धनतेरसच्या दिवशी आपल्या राशीच्या अनुसार वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ होते. कारण सगळ्या राशीचे स्वामी ग्रह वेगवेगळे असतात ज्यांचा प्रभाव सगळ्यांवर पडतो.

मेष राशी: या राशीचा स्वामी मंगल ग्रह आहे. त्यामुळे धनतेरसला या राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने आणि सिक्के किंवा तांब्याची भांडी खरेदी केली पाहिजेत. तसेच या राशीच्या लोकांसाठी पितळ खरेदी करणे देखील शुभ आहे. या राशीचे लोक या शुभ दिवशी पितळाच्या वस्तू खरेदी करतात तर त्यांच्या धनामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी : या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीच्या लोकांसाठी चांदीचा धातू अत्यंत शुभ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी आपल्या इच्छे प्रमाणे कोणतीही चांदीची वस्तू खरेदी केली पाहिजे. आपण चांदीचे सिक्के, दागिने किंवा भांडी खरेदी करू शकता. तसेच कपडे आणि वाहन खरेदी करणे देखील याराशीसाठी शुभ राहील. या राशीच्या लोकांनी चुकूनही सोन्याच्या वस्तू खरेदी करू नयेत.

मिथुन राशी: या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. हा ग्रह कौशल्य, शिक्षण आणि बुद्धी यांचे नेतृत्व करतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शिक्षणाच्या संबंधित वस्तू खरेदी करणे शुभ आणि फलदायी ठरेल. या राशीचे लोक धनतेरसला तांबे धातू पासून बनलेली कोणतीही वस्तू आपल्या घरी आवश्य घेऊ यावे. यामुळे भगवान धन्वंतरीची कृपा आपल्यावर राहील.

कर्क राशी : या राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे आपण धनतेरसच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. पण या राशीच्या लोकांनी कपडे इत्यादी वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे. कर्क राशीच्या लोकांनी धनतेरसच्या दिवशी स्टीलचे भांडे खरेदी अवश्य करावे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊ शकते.

सिंह राशी : या राशीचा स्वामी सूर्य आहे. यामुळे धनतेरसच्या दिवशी सोन्याचे सिक्के किंवा दागिने खरेदी करणे शुभ राहील. त्याच शिवाय आपण धार्मिक पुस्तके आणि भांडी देखील खरेदी करू शकता. या राशीच्या लोकांसाठी सोने अत्यंत शुभ आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी आपल्या सामर्थ्या प्रमाणे सोन्याची वस्तू अवश्य खरेदी करावे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि धन तेरा पटीने वृद्धी होईल.

कन्या राशी : या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी धनतेरसच्या दिवशी चांदीचे सिक्के आणि नवीन वाहन खरेदी करणे शुभ आहे.

तुला राशी : आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा आहे. त्यामुळे आपण धनतेरस शुभ आणि फलदायक बनवण्यासाठी चांदी चे सिक्के, भांडी आणि नवीन कपडे खरेदी करणे उत्तम राहील.

वृश्चिक राशी : या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे आपण या धनतेरसला शुभ आणि फलदायी बनवण्यासाठी सोन्याचे दागिने आणि पूजेचे साहित्य खरेदी करू शकता.

धनु राशी : धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. या राशीच्या लोकांसाठी धनतेरसच्या दिवशी वाहन आणि चांदीचे भांडे इत्यादी खरेदी करणे शुभ आहे.

मकर राशी : आपल्या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. धनतेरसच्या दिवशी आपण वाहन आणि सजावटीचे साहित्य खरेदी करणे आपल्यासाठी फलदायी ठरू शकते.

कुंभ राशी : आपल्या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. आपण या धनतेरसच्या दिवशी चांदी आणि स्टीलची भांडी खरेदी करू शकता.

मीन राशी : या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. या धनतेरसच्या दिवशी आपण सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि इतर वस्तू खरेदी करू शकता. आपण नवीन सौदे देखील करू शकता ज्यामुळे भविष्यात आपल्याला फायदा होऊ शकेल.