dharmik

धन प्राप्तीचे अचूक उपाय, आर्थिक तंगी पासून देतील मुक्ती

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्या मध्ये पैश्यांची गरज असते. सगळे लोक आपल्या आवश्यकतेनुसार धन कमावण्यासाठी मेहनत घेत असतात आणि हर संभव प्रयत्ना मध्ये असतात ज्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतील. पण कधीकधी असे होते कि अनेक प्रयत्ना नंतर देखील व्यक्तीच्या कडे पैसे येत नाहीत किंवा आवश्यक तेवढे धन प्राप्त होत नाही. अश्या परस्थिती मध्ये परमेश्वरा वरील विश्वास कमी होतो कारण आपण केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे आपण निराश झालेलो असतो. पण आपण जीवना मध्ये कधीही हार मानली नाही पाहिजे आणि परमेश्वरावर विश्वास कायम ठेवून काही उपाय केले पाहिजेत. आज येथे काही धन प्राप्तीचे उपाय आपण पाहणार आहोत ज्यांच्या मदतीने आपल्याला आर्थिक तंगी पासून सुटका मिळू शकते हे उपाय अगदी सहज आणि सोप्पे आहेत.

धन प्राप्तीसाठी सहज आणि सोप्पे उपाय

जर आपल्याला सूर्य देवाची कृपा पाप्त करायची असेल तर झोपतांना आपले डोके असे ठेवा कि उठण्याच्या वेळी आपले पाय पूर्व किंवा दक्षिण दिशेला असतील. तसेच आपण दररोज नियमितपणे उगवणाऱ्या सूर्याला तांब्याच्या तांब्याने जल अर्पित करू शकता. जल अर्पित करतांना आपण ॐ आदित्याय नमः या सूर्य मंत्राचा जप करू शकता. असे केल्यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या समस्या दूर होतील आणि आपल्याला धन प्राप्तीचे मार्ग प्राप्त होतील.

आपण दररोज आपल्या इष्ट देवाची पूजा करावी. जर आपल्याकडे वेळेचा अभाव असेल तर कमीतकमी आपण धूप दीप आवश्य दाखवला पाहिजे आणि थोडा वेळ उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ध्यान केले पाहिजे. पूजेच्या वेळी तांब्याच्या भांड्यामध्ये जल भरून ठेवावे आणि त्यास पूजे नंतर घराच्या प्रत्येक भागात शिंपडावे. जर आपण असे केले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जा टिकून राहते.

चुकूनही आपण आपल्या बेडरूम किंवा अंथरुणावर भोजन करू नये यामुळे नकारात्मक प्रभाव पडतो यामुळे आपल्यावर राहूचा अशुभ प्रभाव राहतो त्यामुळे यागोष्टीची काळजी घ्यावी.

दररोज आपल्या घरामध्ये बनणारी पहिली पोळी ही गाईसाठी आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी काढून ठेवावी. जर आपण असे केले तर ग्रहांचे अशुभ प्रभाव समाप्त होतात.

आपण दररोज नियमित पणे तुळशीच्या रोपट्यास जल अर्पण केले पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळी तुळशी जवळ दिवा लावला पाहिजे. आपण असे केले तर आपल्या घरावर नेहमी लक्ष्मीची कृपा राहते आणि आपल्या जीवनामध्ये कधीही धनाच्या संबंधित समस्या निर्माण होत नाहीत.

व्यक्तीने नेहमी यागोष्टीची काळजी घेतली पाहिजे कि कधीही सूर्यास्त आणि सूर्योदय होण्याच्या वेळी झोपले नाही पाहिजे असे केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक दुख आणि समस्या येऊ शकतात. आपल्याला आर्थिक समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.

Tags

Related Articles

Back to top button