money

जाणून घ्या फक्त 250 रुपये दरवर्षी जमा करा, 21 वर्षांनी मिळेल बंपर रक्कम, पहा योजनेचे नियम आणि अटी

आपल्या सर्वांनाच माहित आहे की भारत सरकार मुलींसाठी नवीन योजना नियमितपणे आणत असते. या सर्व योजनांच्या मागे सरकारचा उद्देश आहे की कोणतीही मुलगी कुटुंबाने बोझ समजू नये आणि तिला संपूर्ण शिक्षण मिळावे. काही काळापूर्वी सरकारने स्कीम आणली होती ज्यामध्ये बैंकेत खाते उघडून प्रत्येक महिन्यास काही रक्कम जमा केल्यास निश्चित काळानंतर एक मोठी रक्कम मिळणार होती. त्याच्या पुढे जाऊन आता केंद्र सरकार ने मुलींच्या भल्यासाठी एक पाऊल अजून उचलले आहे. यावेळी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. खरतर ही योजना 2016 पासून सुरु आहे पण सरकारने यामध्ये काही बदल करून ही अजून जास्त सोप्पी केली आहे. बातम्यांच्या नुसार आता हजार रुपयाच्या एवजी या योजनेसाठी आपल्याला फक्त 500 रुपये जमा करावे लागतील. सरकारच्या या प्रयत्नामुळे जास्तीत जास्त लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. चला तर पाहू या योजने बद्दल सविस्तर.

जास्त दराने मिळतो व्याज

एका रिपोर्ट अनुसार सुकन्या समृद्धी योजना खात्यातील व्याज दर इतर लघु बचत योजना आणि पीपीएस प्रमाणे प्रत्येक तीन महिन्यात ठरवले जातात. यावेळी जुलै ते सप्टेंबर या तिमाही मध्ये व्याज 8.1% आहे. अरुण जेटली यांनी आपल्या बजेट भाषणात दावा केला होता की 2015 मध्ये सुरु झालेल्या सुकन्या समृद्धी खाता योजनेत 2017 पर्यंत देशभरात प्रत्येक लहान मुलीच्या नावावर 1.26 करोड खाते उघडले गेले होते. या सर्व खात्यांची एकूण रक्कम 19,813 करोडच्या जवळपास होती.

असे उघडता येईल खाते

जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेचे नियम आणि अटी माहित असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने ठरवले आहे की जी मुलगी 10 वर्षापेक्षा कमी वयाची आहे तिचे आई-वडील कायदेशीर पणे त्यामुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बैंकेत सहज उघडता येईल. यावर सरकार द्वारे कोणत्याही प्रकारचा टैक्स नाही लागत. नवीन नियमानुसार आता जर हे खाते 21 वर्ष सुरु राहिले आणि यामध्ये आवश्यक पैसे जमा केले जात असतील तर ही रक्कम वाढून काही करोड होईल.

हे कागद पत्रे आवश्यक

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची गरज पडेल. हे कागदपत्रे असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बैंकेत सहज खाते उघडू शकता.

1. सुकन्या समृद्धी योजना अकाऊंट फॉर्म

2. तुमच्या मुलीच्या जन्माचा दाखला.

3. मुलीच्या आई-वडिलाचे ओळखपत्र जसे पैन कार्ड , ड्राइविंग लाइसेंस, आधार कार्ड इत्यादी.

4. मुलीच्या आई-वडिलांच्या पत्त्याचा पुरावा. ड्राइविंग लाइसेंस, आधार कार्ड इत्यादी.

5. S S Y चा फॉर्म  जो तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बैंकेत सहज मिळेल.

हे फायदे मिळतात

जर तुम्ही पूर्वी खाते उघडले असेल तर तुम्हाला व्याजदराच्या प्रमाणे कमी रक्कम मिळेल तर 2018 च्या योजनेत खाते उघडल्यास व्याजदर 8.1% मिळेल ज्यामुळे 21 वर्षा नंतर जर तुम्ही बैंकेतून रक्कम काढली तर ही रक्कम 5,27,036 रुपयेच्या आसपास होईल. तेव्हा बैंक ज्या मुलीच्या नावाने खाते उघडले आहे तिच्या नावानेच पैसे देईल. ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी देखील फायदेशीर ठरेल कारण फक्त 250 रुपये वर्षाला भरून मोठी रक्कम मिळणार आहे.


Show More

Related Articles

Back to top button