Connect with us

केस काळे करण्याचा सर्वात स्वस्त घरगुती उपाय, शेकडो वर्ष जुना आहे हा उपाय

Hair Care

केस काळे करण्याचा सर्वात स्वस्त घरगुती उपाय, शेकडो वर्ष जुना आहे हा उपाय

केस काळे करण्यासाठी शेकडो वर्षा पासून अनेक फूड आणि वेजिटेबलचा वापर करण्यात आलेला आहे. सांची बौध्द आणि भारतीय ज्ञान विश्वविद्यालयच्या आयुर्वेद विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अखिलेश सिंह यांचे म्हणणे आहे की बाजारात मिळणारी किंवा घरीही उगवली जाऊ शकणारी भाजीच्या मदतीने केस दीर्घ काळ पर्यंत काळे आणि दाट ठेवले जाऊ शकते. कोणती भाजी केसांना काळे ठेवण्यासाठी फायदेशीर आहे?

दोडक्याची भाजी बाजारात सर्वात स्वस्त मिळणाऱ्या भाजी पैकी एक आहे. अनेक लोक ही भाजी घरी देखील उगवतात. आयुर्वेद मध्ये या भाजीला केसांसाठी अत्यंत फायदेशीर सांगितले गेले आहे.

कसे बनवावे तेल

एक दोडका घेऊन त्याचे बारीक तुकडे करावे. या तुकड्यांना सूर्यप्रकाशात चांगले सुकवावे.

सुकलेल्या दोडक्याच्या तुकड्यांना स्वच्छ काचेच्या बाटली मध्ये भरावे. वरून शुध्द नारळाचे तेल टाकून बाटली भरावी.

चार दिवसा नंतर दोडक्याचे तुकडे आणि नारळाचे तेल उकळवा आणि तेला मध्ये दोडकी काळे होई पर्यंत उकळावा (तळणे).

थंड झाल्यावर हे तेल गाळून बाटली मध्ये भरून ठेवा. रेग्युलर या तेलाने केसांना मालिश करावी.

केसांना काळे आणि घनदाट कसे करावे.

दुधी भोपळ्याचा रस नारळाच्या तेला मध्ये मिक्स करून केसांना लावल्यामुळे केस दीर्घकाळ लांब आणि घनदाट राहतात.

कांद्याचा रस नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून रेग्युलर केसांना लावल्यामुळे केस गळणे बंद होतात.

चहा पावडर पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्यामुळे केस काळे, घनदाट आणि लांब होतात.

वरील सर्व उपाय अत्यंत सोप्पे आणि शेकडो वर्ष लोक वापरत आलेले आहेत त्यामुळे यावर विश्वास ठेवण्यास काही हरकत नाही. या पैकी तुम्हाला जो उपाय सोयीस्कर वाटतो तो नक्की करून पहा.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा : दोडक्याची भाजी आरोग्यासाठी अजून काय फायदे देते ते येथे वाचा

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top