कुरान मध्ये ज्या एक डोळ्याच्या ‘दज्जाल’ बद्दल लिहिले आहे, काय खरंच तो जन्माला आला आहे…

सोशल मीडिया वर एक डोळ्याच्या मुलाचा व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहे. त्याच सोबत एक दावा केला जात आहे कि कुरान मध्ये ज्या ‘दज्जाल’ बद्दल लिहिलेलं आहे तो आता इज्राइल मध्ये जन्माला आला आहे. व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या मुलाचा फक्त एकच डोळा आहे आणि तो देखील कपाळाच्या मधोमध. त्यामुलाच्या चेहऱ्यावर नाक नाही आहे, पण तोंड आहे.

वायरल पोस्ट :

Srk Khan नावाच्या फेसबुक युजर ने हा व्हिडीओ शेयर करताना लिहिले आहे :

कुरान में अल्लाह पाक ने फ़रमाया है कि इज़राइल में दज्जाल पैदा होगा जिसकी एक आँख होगी। अब इज़राइल में ये बच्चा पैदा हो गया है……अल्लाह हम सब की हिफाज़त फरमाये।सच्ची और पक्की तौबा नसीब फरमाये।आमीन
हा व्हिडीओ आता पर्यंत 15 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. असेच काही इतर युजर्स देखील अश्याच कैप्शन सोबत हे व्हिडीओ शेयर करत आहेत.

चला आता जाणून घेऊ ‘दज्जाल’ बद्दल :

इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुरान च्या अनुसार कयामत (सर्वंनाश) होण्याची निशानी आहे ‘दज्जाल’ चे येणे. तो काना (तिरळा) असेल. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये ‘काफिर’ लिहिले असेल. ज्यास प्रत्येक मुसलमान वाचू शकेल मंग तो अशिक्षित असला तरी देखील. पण एक काफिर त्यास नाही पाहू शकणार. तो आपल्या खुदाई चा दावा करेल. जो त्यास खुदा (परमेश्वर) मानेल, तो त्याला आपल्या स्वर्गात ठेवेल आणि जो त्यास नकार देईल, त्याला तो नरकात टाकेल.

‘दज्जाल’ बद्दल लिहिले आहे कि जेव्हा तो येईल तेव्हा जगात पाप आपल्या चरम सीमेवर पोहोचलेलं असेल. सगळीकडे कत्लेआम, खून खराबा आणि वाईट विचार पसरलेले असतील. ‘दज्जाल’ च्या येण्या नंतर या सगळ्यात अजून जास्त वाढ होईल. शेवटी ईसा अलैहिस्सलाम पुन्हा धरतीवर येतील आणि दज्जाल चा खात्मा करतील.

व्हायरल व्हिडीओचे सत्य

आम्ही पहिले ‘एक डोळ्याचा मुलगा’ या किवर्ड ने इंटरनेट वर सर्च केले तेव्हा समजले कि हा व्हिडीओ 2013 पासून शेयर केला जात आहे.

खरतर हा मुलगा अतिशय दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे ज्याचे नाव CYCLOPIA आहे. या आजारात मुलाच्या चेहर्यावर एकच डोळा असतो. डॉक्टरांच्या अनुसार हा आजार तेव्हा होतो जेव्हा मुलगा आईच्या गर्भात असतो आणि अधिक जास्त रेडिएशन च्या संपर्कात येतो. यांचे हृदय देखील योग्य आकारात नसते. या आजारासह जन्मलेले मुल दीर्घ आयुष्य जगत नाही आणि जन्माच्या काही दिवसा नंतरच मृत्यू होतो.

आपल्या माहितीसाठी हा आजार प्राण्यांमध्ये जास्त दिसून येतो. याचे नाव CYCLOPIA मिस्र च्या एक डोळ्याच्या पौराणिक दैत्य च्या नावावरून ठेवले गेले आहे.

पडताळणी मध्ये समजले आहे कि व्हायरल व्हिडीओ मध्ये केलेला दावा चुकीचा आहे. व्हिडीओ मध्ये दिसत असलेला मुलगा CYCLOPIA आजाराने ग्रस्त आहे, त्याचा ‘दज्जाल’ सोबत काहीही संबंध नाही. परंतु हे समजू शकले नाही कि हा व्हिडीओ कुठला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here