सुंदरता टिकवून ठेवायची असेल तर या 9 दैनंदिन चुका करणे टाळा

सुंदर दिसणे सगळ्यांना आवडते पण दैनंदिन जीवनामध्ये लोक अनेक चुका करतात ज्यांचा परिणाम त्यांच्या सुंदरतेवर होतो. आपण देखील काही लहान-मोठया चुका करता का? ज्या आपल्याला भारी पडू शकतात.

कोणताही ऋतू असो, हिवाळा, पावसाळा किंवा उन्हाळा घरातून बाहेर निघताना एक चांगला SPF वाले सनस्क्रीन आवश्य लावा.

कधीही मेकअप काढण्याचा आळस करू नका, कितीही उशीरा घरी परतल्या नंतर देखील मेकअप काढल्या शिवाय झोपू नका.

सगळ्याच फळांचा गर किंवा साल चेहऱ्यावर रगडण्याची चूक करू नका. ज्या घरगुती उपायाला पहिले केलेला नसेल, त्यास पहिले आपल्या अंडरआर्म किंवा जांघ यांच्या खालील भागावर करून त्याचा परिणाम पहा. प्रत्येक हर्बल किंवा ऑर्गेनिक वस्तू केमिकल फ्री असतेच हे आवश्यक नाही.

आपल्या चेहऱ्यावर मेकअपचे जास्त लेयर लावू नका. कन्सीलर, फाउंडेशन, पावडर किंवा ब्लशर जास्त लावू नये. कमीत कमी मेकअप मध्ये सुंदर दिसणे हीच मेकअपची कला आहे. दोष आणि कमतरता लपवण्यासाठी कमीतकमी मेकअप वापरून चेहरा सुंदर करण्याचा प्रयत्न करा.

नेहमी मेकअप लावून ठेवू नका, चेहऱ्याला बहुतेक वेळा बिना कोणताही मेकअपच्या देखील राहू द्या. ज्यामुळे त्वचेचे रोमछिद्र ताजी हवा मिळवू शकतील.

अंघोळ केल्या नंतर लगेच कोरड्या टॉवेल ने शरीर भरपूर रगडू नका. यामुळे त्वचेच्या खालील सुरक्षित पाणी देखील निघून जाते. त्वचेचा ओलावा साठवून ठेवण्यासाठी अंघोळ केल्या नंतर भरपूर मॉइश्चराइजर किंवा बॉडी लोशन लावावे.

एक्सफॉलिएट म्हणजेच मृत त्वचा काढण्याची प्रक्रिया सतत करू नये. कारण ओवर एक्सफॉलिएशन मुळे त्वचा कोरडी आणि क्षतिग्रस्त होते. त्वचेचा सुरक्षा कवच निघून जातो आणि ते इन्फेक्शन होण्यासाठी एक्स्पोज होते.

जी क्रीम आपल्या बहीण वहिनी किंवा मैत्रीण यांना सूट होतात, तीच क्रीम तुम्हाला देखील फायदा करेल हे आवश्य नाही. त्वचारोग तज्ञाच्या सल्ल्यानेच क्रीम चेहऱ्यावर लावा.

भरपूर झोप घ्या. तणाव आणि चिंता यांना जीवनात स्थान देऊ नका. यामुळे आपले सौंदर्य नेहमी आपल्या सोबत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here