Connect with us

कडीपत्ता देतो कमालीचे फायदे, याचे फायदे समजल्यावर वापरल्या शिवाय राहणार नाहीत तुम्ही

Food

कडीपत्ता देतो कमालीचे फायदे, याचे फायदे समजल्यावर वापरल्या शिवाय राहणार नाहीत तुम्ही

कडीपत्ता हे झाड संपूर्ण भारतामध्ये आढळते आणि आपण कडीपत्ता स्वयंपाक करताना देखील वापरतो. आयुर्वेद अनुसार याचे अनेक फायदे आहेत. याच्या मदतीने अनेक आरोग्य विषयक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. कडीपत्त्याच्या ताज्या पानांमध्ये एक वेगळाच सुगंध असतो जो फ्रीज मध्ये किंवा बाहेर ठेवल्याने कमी होतो. यासाठी शक्य असल्यास ताज्या कडीपत्ता वापरावा.

कडीपत्ता सेवन केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात.

कडीपत्ता आपल्याला खालील फायदे देतो

लिवरसाठी फायदेशीर

आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग लिवर आहे हा न थांबता काम करत असतो यासाठी याचे निरोगी राहणे आवश्यक आहे. कडीपत्ता लिवर मजबूत करते. कडीपत्ता लिवरला बैक्तीरीया आणि वायरल इन्फेक्शन पासून वाचवते. याच सोबत हे फ्री रेडिकल्स हेपेटाइटिस सिरोसिस सारख्या आजारापासून रक्षण करते.

डोळ्यांना ठेवते निरोगी

विटामिन ए कडीपत्यामध्ये भरपूर असते. जर व्यक्तीच्या शरीरामध्ये विटामिन ए कमी असलेल तर त्याची नजर कमी होते त्यामुळे विटामिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या शरीरातील विटामिन ए ची कमी दूर करू इच्छित असाल तर कडीपत्ता सेवन करा. ज्यामुळे तुमच्या डोळ्याच्या संबंधीतील समस्या दूर होतील आणि नजर चांगली होईल.

केसांसाठी फायदेशीर

कडीपत्यामध्ये केसांना मॉइश्‍चराइजिंग करण्याचे गुण असतात जे केसांना सखोल स्वच्छ करते. केसांना वाढवण्या सोबतच मजबूत करतो यासाठी कडीपत्याची पावडर बनवा आणि यास तिळाच्या किंवा खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा आणि थोडे गरम करून डोक्यावर मसाज करा आणि रात्रभर तसेच ठेवा नंतर सकाळी धुवून टाका. तुम्ही हा उपाय केल्यास तुमचे केस गळणे थांबतील आणि केस मजबूत होतील.

कैंसर पासून बचाव

कडीपत्यात अनेक प्रकारचे एंटीआक्सीडेंट आणि फेनोल्स असतात जे आपल्याला कैंसर सारख्या गंभीर आजारापासून आपल्याला वाचवण्यासाठी मदत करतात. काडीपत्यात असलेले विशेष तत्व ल्यूकेमिया प्रोस्टेट कैंसर आणि कोलोरेक्टल कैंसर सारख्या आजारा पासून बचाव करण्यास सक्षम आहेत.

डायबिटीज मध्ये फायदेशीर

जर कडीपत्ता सेवन केला तर रक्ता मधील शुगरचे प्रमाण कमी होते यामध्ये असलेले फाइबर पण शुगर लेवल योग्य करण्यास आपली मदत करतो याच सोबत हे आपले पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला डायबिटीज पासून वाचायचे असेल तर कडीपत्ता आवश्य सेवन करा.

Trending

Advertisement
To Top