foodhealth

खरच रात्रीच्या जेवणाच्या वेळेत दही खाऊ नये का?

दूध पिणे आवडत नसलेल्यांसाठी दही हा प्रोटीन, कॅल्शियम यासोबतच अ‍ॅसिडीटी शमवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. वेळी अवेळी खाणे, तसेच अरबट-चरबट पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील ‘चांगल्या बॅक्टेरीया’चे संतुलन  बिघडण्याची शक्यता असते. मात्र दह्याच्या सेवनाने हे नियंत्रण राखण्यास मदत होते.  परंतू अनेकजण रात्रीचे दही खाणे टाळा असा सल्ला देतात. दह्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतानाही ‘दही’टाळण्याचा सल्ला का दिला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

आहारतज्ञांच्या मते, ‘दही प्रत्येकालाच त्रासदायक ठरते असे नाही. त्यामुळे सर्दी-पडशाचा तीव्र त्रास असलेल्यांनी रात्रीचे दही टाळावे.’ कफाचा त्रास नसणार्‍यांनी रात्रीच्या जेवणात दही किंवा ताकाचा समावेश करणे फायदेशीर ठरतो. दह्यामुळे दात आणि हाडं मजबूत होतात. तसेच सकाळी पोटफुगी  (ब्लोटींग)चा त्रास होत नाही.

कसा कराल दह्याचा  रात्रीच्या आहारात समावेश ? 

1. दही-भात :

गरम भातामध्ये दही मिसळा. त्यावर चवीनुसार साखर किंवा मीठ आणि मिरपूड मिसळा. तुम्हांला आवडत असल्यास या भातावर लाल मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी घालू शकता. यामुळे चटपटीत पण हेल्दी जेवणाचा आस्वाद चाखू शकाल.

2. गोड दही : 

तुम्हांला गोड खाणे आवडत असेल तर तुम्हांला साखर -दही हा झटपट प्रकार नक्की आवडेल. घट्ट दह्यामध्ये चवीपुरती साखर मिसळा. यामुळे दह्याची चव वाढेल. तसेच रात्रीच्या जेवणात त्याचा समावेश केल्यास पोटातील अतिरिक्त अ‍ॅसिडीटी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

3. ताक :

जेवणानंतर ताक किंवा छास पिणे हा उत्तम पर्याय आहे. यामुळे पोटात थंदावा निर्माण होतो तसेच अ‍ॅसिडीटी वाढवणार्‍य बॅक्टेरियांवरही मात करण्यास मदत करते.

4.लस्सी :

गोड आणि घट्ट ताक म्हणजे लस्सी ! मलई आणि साखरेमुळे लस्सी घट्ट होते.

5. कढी : 

पातळ ताकाला जिरं मोहरी आणि कढीपत्त्याच्या फोडणीमध्ये बेसन घालून उकळी काढणं म्हणजे कढी !  गरमागरम कढी भात किंवा चपातीसोबत  तुम्ही खाऊ शकता.

6.फ्रुट सलॅड :

केळी, डाळींबाचे दाणे, पपई किंवा सफरचंद अशी गोड फळं दह्यात मिसळून खाणे अत्यंत चविष्ट आणि आरोग्यदायी ठरते. तसेच हा झटपट होणारा डेझर्टचा प्रकार आहे.

7. रायता :

भारतीय जेवणात विविध प्रकारच्या  रायताचा समावेश केला जातो. बीट, मुळा आणि गाजराची कोशींबीर  केल्यानंतर त्यात थोडे दही मिसळा.


Show More

Related Articles

Back to top button