Uncategorized

मुंबई मध्ये सीएसएमटी स्टेशन जवळील फूट ओव्हर ब्रिज पडला, प्राथमिक माहिती नुसार 2 मृत तर काही जखमी झाले

मुंबई मधील सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सची इमारत यांना जोडणारा पूल कोसळल्याची बातमी आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या काही गाड्या त्वरित दाखल झालेल्या आहेत तर दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत तसेच पुलाचा सांगाडा दूर करण्याचे काम सुरु झाले आहे. पूल कोसरल्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. या वेळेत भरपूर गर्दी असल्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पुलाचा काम हॉस्पिटल बाजूचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत पुलाचा काँक्रीटचा सगळा भाग पडला असून फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे.प्रार्थमिक माहिती अनुसार सीएसएमटी पूल दुर्घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच जवळपास 10 व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना जीटी, सेंट जॉर्ज आणि सायन हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरु झालेले आहे.

स्थानिक नगरसेवकांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षा पूर्वीच निवेदन दिले होते. मात्र पुलाचे ऑडिट झाले नाही. असे स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी माहिती दिली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या ऑडिट बद्दल दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला आहे. तसेच या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

ताज्या माहितीसाठी न्यूज चैनल पाहावे.


Show More

Related Articles

Back to top button