celebrities

क्रिटिकल कंडीशन मध्ये हॉस्पिटल मध्ये भरती झाले 81 वर्षाचे कादर खान, लोकांना ओळखणे केले बंद

जेव्हा पण बॉलीवूड कॉमेडीचा विचार मना मध्ये येतो तेव्हा कादर खान आठवल्या शिवाय राहत नाहीत. कादर खान एक असे दिग्गज अभिनेता म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्याला त्यांच्या कॉमेडी रोल मध्ये जेवढे हसवले आहे तेवढेच त्यांच्या खलनायकी भूमिकेने घाबरवले देखील आहे. कादर खान कधीही एकाच प्रकारच्या भुमिके मध्ये कधी दिसले नाहीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. कधी आपल्याला पोट धरून हसवले आहे तर कधी डोळ्यातील अश्रू देखील बाहेर काढले आहेत. कादर खान यांची सगळ्यात जास्त जादू 90 च्या दशका मध्ये चालली. गोविंदा सोबत विविध भुमिके मध्ये ते आपल्याला अनेक चित्रपटा मध्ये दिसले या मध्ये हिरो नंबर 1, राजा बाबू, दुल्हे राजा, आखे इत्यादी समाविष्ट आहेत. कदाचित तुम्हाला माहित नसेल परंतु कादर खान हे उत्तम संवाद लेखक होते आणि त्यांनी अनेक चित्रपटाचे संवाद स्वता लिहिले आहेत जे ऐकून आपल्याला खदखदून हसायला येते. पण लोकांना आपल्या बोलण्यातून हसवणाऱ्या कादर खान यांची प्रकृती क्रिटिकल आहे. त्यांना क्रिटिकल कंडीशन मध्ये कनाडा मधील हॉस्पिटल मध्ये भरती केले गेले आहे. कादर खान यांचे सध्याचे वय 81 वर्ष आहे.

वेंटीलेटर वर ठेवण्यात आले आहे

हॉस्पिटल मध्ये त्यांना BiPAP वेंटीलेटर वर ठेवले आहे. सोबतच प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर मुळे त्यांच्या बुद्धीने काम करणे बंद केले आहे. काही दिवसा पासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे ज्यामुळे त्यांना बाइपेप वेंटीलेटर वर ठेवले आहे. सध्या त्यांची हालत नाजूक आहे. ही माहिती त्यांचे पुत्र सरफराज खान यांनी दिली आहे.

81 वर्षाचे आहेत कादर खान

81 वर्षीय कादर खान यांना दीर्घकाळा पासून बोलण्यास देखील त्रास होत होता. ते फक्त आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्यास समजू शकत होते. पूर्वी ते लोकांना ओळखत असत परंतु आता त्यांना लोकांना ओळखणे कठीण जाते. खरतर प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी एक असामान्य मस्तिष्क विकार आहे जो शरीराची गती, संतुलन, बोलणे, गिळणे, पाहणे, मनोदशा आणि व्यवहारा सोबतच विचारांना प्रभावित करतो. कादर खान सध्या कनाडा मध्ये त्याने पुत्र सरफराज सोबत राहतात.

या चित्रपटा मध्ये काम केले आहे

कादर खान यांच्या फिल्मी करियरची सुरुवात ‘दाग’ या फिल्म मधून झाली होती जी 1972 मध्ये आलेली. याच सोबत त्यांनी अदालत, परवरिश, दो और दो पांच, याराना, खून का कर्ज, तेरा जादू चल गया, हीरो नंबर 1, दूल्हे राजा, दिल ही तो है, कुली नंबर 1 या सुपरहिट चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट 2015 मध्ये आला होता ज्याचे नाव ‘दिमाग का दही’ होते.

गुडघ्यांची सर्जरी झाली होती

कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये त्यांनी सांगितले कि कादर खान यांना चालण्या फिरण्यात त्रास होत होता. चालण्यासाठी त्यांना दोन्ही बाजूने मदत द्यावी लागत होती. काही पाऊले चालल्यावर त्यांना थकवा येत होता आणि ते बसून जात असत. त्यांना असे वाटत होते कि जास्त वेळ चालल्यावर ते पडतील. सरफराज यांनी सांगितले कि त्यांनी कादर खान यांच्या गुडघ्याची सर्जरी करून घेतली होती. सर्जरी यशस्वी झाली आणि डॉक्टरांनी दुसऱ्याच दिवशी त्यांना चालण्याचा सल्ला दिला पण ते चालायला घाबरत होते. असो आपण आशा करू लवकरात लवकर कादर खान यांच्या आरोग्यात सुधारणा होऊन ते निरोगी व्हावे आणि आपल्या घरी परतावे.


Tags
Show More

Related Articles

One Comment

Back to top button