health

तुमच्या बोटांमधून टकटक आवाज येतो, याचा संबंध कोणत्या आजाराशी आहे पहा

बोटे मोडण्याची सवय

आपल्यापैकी अनेकांना हाताची बोटे मोडून आवाज काढण्याची सवय असेल. काही लोकांना कंटाळा आला किंवा करण्यासारखे काही काम नसेल तर ते बोटे मोडतात. तर काही लोक बोटांच्या हाडाच्या जॉईनट मध्ये होणाऱ्या वेदना पासून आराम मिळतो असे मानतात. काही लोक असे ठराविक वेळा नंतर सारखे असे करतात. तुम्ही असे करण्यामागे कोणताही उद्देश असो पण काय हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे का असे केल्यामुळे नुकसान होते?

काय बोटे मोडणे सामान्य आहे?

तुम्ही दिवसभर आपल्या बोटे मोडण्याच्या सवयीकडे लक्ष सुध्दा देत नसाल तुमच्यासाठी ही एक सवय झाली असेल ज्यामुळे तुमचे या सवयीकडे लक्षही जात नसेल. पण ही सवय तुमच्या हाडांसाठी सामान्य आहे का? आपण बोटे मोडतो तेव्हा त्याचा आवाज का येतो आणि असे करणे आपल्या आरोग्यावर किती प्रभाव पडतो चला पाहूया.

बोटे मोडल्यावर आवाज का येतो?

विज्ञानाच्या अनुसार बोटांमध्ये किंवा हाडांच्या जोडा मध्ये एक खास प्रकारचा द्रव पदार्थ असतो ज्याला श्र्लेष द्रव असे म्हणतात. हे द्रव आपल्या हाडांना खरबडीत होण्या पासून आणि घर्षणा पासून वाचवते. तुम्ही असे म्हणू शकता की हे द्रव हाडांच्या जोडामध्ये ग्रीसचे काम करते. या लिक्विड मध्ये असलेला गैस हाडांच्या मध्ये बुडबुडे बनवतो.

बोटे मोडण्याचा मोठा आवाज कसा येतो?

जेव्हा आपण बोटे ओडतो तेव्हा हे बुडबुडे फुटतात ज्यामुळे बोटे मोडण्याचा आवाज येतो. एकदा बोटे मोडल्यावर हाडांच्या जोडामध्ये असलेले हे बुडबुडे फुटल्यानंतर पुन्हा तयार होण्यास 15 ते 30 मिनिट लागतात. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की एकदा बोटे मोडल्यावर पुन्हा लगेच बोटे मोडली तर आवाज येत नाही.

आपल्या हाडांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे

तज्ञांच्या मते हे लिक्विड आपल्या हाडांच्या हालचालीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर हे कमी झाले किंवा संपले तर हाडे एकमेकांना घासल्यामुळे जोडांमध्ये वेदनासुरु होतात.

तुमच्यासाठी करू शकतो अनेक समस्या उत्पन्न

तसे पाहिलेतर अनेक शोधांच्या अनुसार बोटे मोडल्यामुळे या लिक्विड मध्ये कमतरता येणे, सांध्यामध्ये वेदना यासर्वाशी काही संबंध नाही पण तज्ञ असे मानतात की बोटे मोडणे तुमच्या हाडांसाठी चांगले नसते. त्याच सोबत जर तुम्ही सारखे सारखे सांध्यांना असे ओढले किंवा त्यावर ताण दिला तर हाडामध्ये गैप येऊ शकतो.

वाईट सवय आहे

बोटे मोडल्यामुळे सांध्यांना हानी पोहचते त्यामुळे ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा.


Show More

Related Articles

Back to top button