relationship

एका आईच अनोखे प्रेम, 4 वर्षा पासून आपल्या वासराच्या मारेकऱ्याला देत आहे सजा, व्हिडीओ पाहून मन भरून येईल

जगात सर्वात जास्त पवित्र आणि सुंदर प्रेम कोणते असते तर ते आई आणि मुलाचे, मग ते माणूसाचे असो किंवा पशुपक्ष्यांचे आई शेवटी आईच असते. याची प्रचीती तुम्ही अनेक वेळा घेतली असेल पण आज आम्ही तुम्हाला कर्नाटक मधील अश्या घटनेची माहीती देणार आहोत जी समजल्यावर तुमचे डोळे नक्की पाणावतील.

कर्नाटक मधील सिरसी मध्ये 4 वर्षा पूर्वी एका गाईचे वासरू बस खाली आले त्यामुळे वासराचा मृत्यू झाला होता. ही दुखद घटना झाल्या नंतर वासराची आई बऱ्याच वेळ घटनास्थळी उभी होती आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. पण वासरू मेले होते आणि गाय अनेक प्रयत्न करून थकली पण वासरू काही उठले नाही. शेवटी आई ती आईच. ती कशी काय आपल्या मुलाला विसरेल. या गोष्टीला 4 वर्ष झाले आणि सर्व लोक ही गोष्ट विसरून गेले पण ही गाय 4 वर्षानंतर देखील बस आणि तिच्या ड्रायवरला माफ करू शकली नाही. या गाईला जेथे पण ही बस दिसते त्या बसला थांबवण्यासाठी ती बस समोर येते.

तुम्हाला सांगू इच्छितो गाय फक्त त्याच बस आणि ड्रायवरला अडवण्याचा प्रयत्न करते. तेथे असलेले शेकडो लोक हे सर्व पाहत असतात. जेव्हापण ही बस या रस्त्याने जाते तेव्हा बऱ्याच वेळा ही गाय या बस समोर येते आणि बसला थांबवण्याचा प्रयत्न करते. गाईला बस समोरून दूर करण्यासाठी नाईलाजाने लोकांना काठी घेऊन हाकलावे लागते पण ती पुन्हा पळत जाऊन बस समोर येते. रोजच्या या घटनेमुळे बसला नवीन रंग देण्यात आला तरीही गाय बसला ओळखून बस समोर येते. गाय आज पण त्याच जागी बसते जेथे वासरू मेले होते.

तुम्हीच पहा व्हिडीओ


Show More

Related Articles

Back to top button