People

उन्हाळ्यात घराच्या आतील तापमान थंड ठेवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय

आपल्या घराचे तापमान उन्हाळ्यात एवढे वाढते की आपल्याला पंखे, एयर कुलर किंवा एयर कंडिशनर लावण्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय आपले घर थंड ठेवण्यासाठी सुचत नाहीत पण आज आम्ही येथे काही घरगुती नैसर्गिक सोप्पे उपाय सांगत आहोत ज्यामुळे एयर कुलर किंवा एयर कंडिशनरचा वापर केला नाही तरी घर थंड राहील. चला तर पाहू कोणते हे सोप्पेसोप्पे घरगुती उपाय तुम्हाला उन्हाळ्यात गारवा देतील.

छत थंड ठेवा

तज्ञांच्या अनुसार घराचे छत सूर्याच्या किराणातील उष्णता शोषण्याचे काम करतात. घराच्या छताचा रंग गडद असेल तर ते जास्त गरम होते. नेशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशन च्या वैज्ञानिक लोकांच्या मते घराचे छत सफेद रंगाने रंगवले किंवा पीओपी केले तर यामुळे 70 ते 80 टक्के उष्णता कमी शोषली जाते. सफेद रंग रिफ्लेक्टर म्हणून चांगले काम करतो.

पडदे वापरा

जास्त सूर्यप्रकाश घरामध्ये जास्त उष्णता निर्माण करतो. यापासून वाचण्यासाठी घरामध्ये खिडक्या आणि दरवाज्यावर पडदे वापरा. पडदे उष्णतेला शोषून घेतात आणि घर थंड ठेवतात. गडद रंगाचे पडदे उष्णता आपल्याकडे आकर्षित करते तर पेस्टल, हलके आणि व्हाईट रंगाचे पडदे उष्णते पासून बचाव करतात. म्हणजेच पडद्याचा रंग जेवढा फिक्का तेवढे तुमचे घर थंड राहील.

कार्पेट किंवा गालीचा वापरू नका

कार्पेट वापरल्यामुळे देखील घर गरम होते. यासाठी घरात थंडावा टिकवण्यासाठी कार्पेट वापरू नका. फक्त फरशी थंड राहते. आणि उन्हाळ्यात थंड फरशीवरून चालणे चांगले वाटते.

खिडकी पासून थंडावा

खिडकीमुळे ही नैसर्गिक पणे तुमचे घर थंड राहू शकते. यासाठी आवश्यक आहे की दिवसा घराच्या खिडक्या बंद ठेवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा यामुळे घरात दिवसाची गरम हवा येणार नाही आणि रात्री थंड हवा येऊ शकेल ज्यामुळे घर थंड राहील.

बेडकवरचे रंग

उन्हाळ्यात गडद रंगामुळे उष्णता जास्त जाणवते. यासाठी घरात थंडावा टिकवण्यासाठी बेडरूम मधील बेडकवर लाईट कलरचे किंवा सफेद, हलके गुलाबी आणि हलक्या पिवळ्या रंगाचे ठेवा तर निळा आणि लाल रंग उष्णता वाढवतात.

पाण्यापासून थंडावा

घरात थंडावा राहण्यासाठी आवश्यक आहे की घराचे छत थंड असावे. यासाठी सकाळ संध्याकाळ घराच्या छतावर पाण्याचा वापर करून थंडावा निर्माण करा. यामुळे घराच्या भिंतीचे तापमान थंड राहते. याच सोबत टब किंवा भांड्यात पाणी भरून रूम मध्ये ठेवा ज्यामुळे पंख्याची हवा पाण्याच्या संपर्कात येईल आणि घर थंड राहील.

उपकरणांचा कमी वापर

विजेवर चालणारे उपकरणे तुम्हाला भरपूर मदत करतात यामध्ये कोणतीही शंका नाही पण यांच्या मुळे घर जास्त गरम होते. कारण विजेवर चालणाऱ्या उपकरणामुळे जास्त उष्णता निर्माण होते. यासाठी आवश्यकता नसल्यास टिव्ही, डेस्कटॉप, वॉशिंग मशीन आणि ओवन सारखे उपकरण कमी वापरले पाहिजेत.

लाइट कमी वापरा

घरात लावलेले विजेवरचे दिवे उष्णता निर्माण करतात यासाठी जास्त उजेड देणारे बल्ब लावणे टाळावे. जेथे बसण्याची जागा असेल बरोबर त्यावर बल्ब लावणे टाळावे. सिलिंग लाईट जास्त उष्णता निर्माण करतात.

झाडेझुडपे पासून थंडावा

घराच्या प्रवेशद्वार आणि अंगणात झाडेझुडपे लावल्यामुळे थंडावा निर्माण केला जाऊ शकतो. झाडेझुडपे लावल्यामुळे घराच्या आतील तापमान 6 ते 7 डिग्री पर्यंत कमी राहते. काही छोटेछोटे झाडे तुम्ही घरात देखील लावू शकता ते घरात हवा आणि थंडावा असल्याची जाणीव निर्माण करतात. यांच्या कडून सोडलेल्या ऑक्सिजनमुळे घर थंड राहते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सावधान… जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर आधी हे वाचा


Show More

Related Articles

Back to top button