Connect with us

लव मैरेजच्या विरुध्द आहेत घरातले तर हे उपाय करा, त्यांचा नकार होकारा मध्ये बदलेल

Relationship

लव मैरेजच्या विरुध्द आहेत घरातले तर हे उपाय करा, त्यांचा नकार होकारा मध्ये बदलेल

आयुष्यात प्रेम तर सर्वांनाच होते पण फार कमी लोक नशीबवान असतात की त्यांना त्यांचे प्रेम मिळते. कधी परिस्थिती साथ देत नाही तर कधी घरवाले नकार देतात. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अजूनही लग्नासाठी घरातील लोकांच्या सहमतीला अतिशय महत्व आहे. तसे सामाजिक दृष्टीकोनातून पाहिले तर ही आपली संस्कृती आहे पण जर व्यावहारिक विचार केला तर अनेक वेळा या कारणामुळे एकमेकांना अनुरूप नसलेल्या जोडप्यांची लग्न होतात आणि परिणामी त्या जोडप्याला आयुष्यभर तडजोड करावी लागते.

त्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही कोणाला पसंत करता आणि लग्न करू इच्छिता हे आपल्या घरावाल्याना सांगणे आणि आपल्या कुटुंबीयांचा होकार मिळवणे. आज आम्ही तुम्हाला काही व्यावहारिक टिप्स सांगत आहोत ज्या अवलंबून तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आणि परिवाराचा तुमच्या प्रेमविवाहसाठी होकार मिळवू शकता.

जर तुम्ही प्रेम केले आहे तर त्यासाठी थोडी हिम्मत आणि प्रयत्न तर केलेच पाहिजेत, ज्यामुळे तुमचा परिवार तुमच्या बाजूने येईल. आणि यामुळे तुम्ही आनंदाने तुमच्या जोडीदारा सोबत जीवनभर राहू शकाल. बहुतेक वेळा फक्त हिम्मत न दाखविल्यामुळे नंतर आयुष्यभर डोक्यावर हात धरून बसावे लागते म्हणून आयुष्यभर ही सल नाही रहावी की कदाचित मी घरातल्यांना विचारले असते तर ते कदाचित हो देखील बोलले असते या करिता थोडी हिम्मत आणि प्रयत्न कराच.

आपल्या पार्टनर ला कुटुंबा सोबत असे मिळवा

कधी ही आपल्या पार्टनर ला सरळ आपल्या लग्नाची गोष्ट करण्याच्या उद्देशाने घरवाल्याच्या सोबत ओळख करून देऊ नका तर हे सांगून भेट घडवा की तो किंवा ती तुमची चांगली मित्र आहे. ज्यामुळे तुमचा पार्टनर तुमच्या परिवारा सोबत चांगल्या प्रकारे मिक्स होऊ शकेल आणि तुमचे परिवारवाले त्याला व्यवस्थित समजू शकतील.

अशी करा लग्नाची गोष्ट

लग्नाची गोष्ट करण्यासाठी कधीही सरळ आपल्या आई वडिलांच्या सोबत न करता आधी आपल्या वयाच्या भाऊ बहिणींना पहिले कल्पना द्या ज्यामुळे ते तुम्हाला सपोर्ट करतील आणि त्यामुळे तुमचे काम थोडे अजून सोप्पे होईल.

अशी मिळावा घरवाल्यांची प्रतिक्रिया

आपल्या पार्टनर आणि घरवाल्यांची ओळख करून दिल्या नंतर घरवाल्यांशी विशेषतः आई वडिलांशी तुमच्या पार्टनर बद्दल चर्चा करा ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की तुमचे आई वडील तुमच्या पार्टनर बद्दल काय विचार करतात.

घराच्या अनुकूल बनवा आपल्या नात्याला

घरातल्यांच्या कडून मिळालेल्या प्रतिक्रियांचा तुम्हाला असा फायदा होईल की तुम्ही कुटुंबीयाकडून सांगितलेल्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू शकता. आपल्या पार्टनर ला अगदी तसेच बनवा जसे तुमचे आई वडिलांना हवे आहे. आपले प्रेम आयुष्यभर आपल्या सोबत राहावे असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला एवढे तर करावेच लागेल यासाठी तुमच्या पार्टनरची सहमती महत्वाची आहे. कारण त्याच्या मदतीनेच तुम्ही आई वडिलांना पाहिजे असलेली अनुकूल व्यक्ती ही तुमची पार्टनर आहे हे दाखवू शकता.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top