health

युरीक एसिड वाढण्याचे कारण, लक्षण आणि याला फक्त 2 आठवड्यात कंट्रोल करण्याचे घरगुती उपाय

युरीक एसिड म्हणजेच सांधेदुखी हा त्रास आजकाल जवळपास सर्वांना होत असल्याचे दिसत आहे. साधारण पणे 30 वर्ष वयानंतर लोकांना हा आजार होतो. हे शरीरातील यूरिक एसिड तुटण्यामुळे होते. जे ब्लड सर्क्युलेशने किडनी पर्यंत पोचते आणि युरीन मार्गे बाहेर निघून जाते, काही वेळा आरोग्याशी निगडीत समस्येमुळे युरीक एसिड शरीरा बाहेर निघू शकत नाही, ज्यामुळे बॉडी मध्ये याचे प्रमाण वाढते.

एका निरोगी महिलेच्या शरीरा मध्ये युरीक एसिडची नॉर्मल लेवल 2.4 – 6.0 mg/dl आणि पुरुषा मध्ये 3.4 – 7.0 mg/dl असणे आवश्यक आहे. शरीरात याचे प्रमाण वाढणे हे संधीवाताचे कारण होते. याची लक्षणे ओळखून वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

युरीक एसिडची लक्षणे

हात-पाय धरणे (Cramps)

सांधेदुखी

अवयव सुजणे

उठण्या-बसण्यास त्रास होणे

युरीक एसिड वाढण्याचे कारण

आहारात पोषक तत्वाची कमी झाल्यामुळे युरीक एसिड वाढणे सुरु होते.

अतिरिक्त औषधे घेण्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो.

आवश्यकते पेक्षा जास्त प्रोटीन खाण्यामुळे रक्तामध्ये युरीक एसिडचे प्रमाण वाढणे सुरु होते.

एक्सरसाईज किंवा शारीरिक श्रम यांची कमतरता यामुळे देखील युरीक एसिड वाढू शकते.

युरीक एसिड कंट्रोल करण्यासाठी घरगुती उपाय

अक्रोड मध्ये अनेक पोषक तत्व असतात जसे ओमेगा-3 फैटी एसिड,विटामिन्स, मिनरल्स, कैल्शियम, प्रोटीन, आयरन इत्यादी असते. जे आरोग्यासाठी चांगले असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी 2-3 अक्रोड खाण्यामुळे युरीक एसिड कंट्रोल होते.

एक चमचा मधा मध्ये अश्वगंधा पावडर मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण गरम दुधा सोबत सेवन करावे. यामुळे देखील भरपूर फायदा होईल. पण लक्षात असू द्या की उन्हाळ्यात किंवा गरम वातावरण असताना कमीत कमी सेवन करावे.

युरीक एसिड वाढल्यानंतर ते शरीरात गाठ सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इतर भागात पसरते. अश्या परिस्थितीत 1 चमचा बेकिंग सोडा 1 ग्लास पाण्या सोबत मिक्स करून पिण्यामुळे शरीरात झालेल्या गाठी विरघळन्यास सुरुवात होते आणि युरीक एसिडची कमी होण्यास सुरुवात होते.

ओवा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. दररोज जेवणामध्ये ओव्याचा वापर केल्यामुळे युरीक एसिड कमी होते. जेवणात वापर करण्यासोबत तुम्ही याचे पाणी बनवून सेवन करू शकता.

रोज बीट आणि सफरचंद यांचा ज्यूस प्यावा. यामुळे शरीराचा पीएच स्तर वाढतो आणि युरीक एसिड कंट्रोल मध्ये राहते. याव्यतिरिक्त गाजराचा ज्यूस देखील फायदेशीर असतो.

जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा कारण यामुळे शरीरातील वाढलेले युरीक एसिड लघवी मार्गे शरीरा बाहेर निघून जातो. याच सोबत पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात उर्जा टिकून राहते.

शरीराचे वजन वाढल्यामुळे चर्बी जमा होते ज्यामुळे युरीक एसिड वाढण्याची शक्यता जास्त असते. यासाठी आपले वजन कंट्रोल मध्ये ठेवा लक्षात ठेवा वजन कमी करण्यासाठी एकदम डाइटिंग वर जाऊ नका. त्याएवजी हळूहळू प्रयत्न करा.

यागोष्टी टाळाव्यात

प्रोटीन असलेले अन्न टाळावे.

बेकारी प्रोडक्ट खाऊ नये.

रेडी टू सर्व फूड खाऊ नये.

मच्छी आणि मटन यापासून दूर राहावे.


Show More

Related Articles

Back to top button