health

बद्धकोष्ठता दूर करण्याचे 10 घरगुती उपाय | Constipation Home Remedies in Marathi

बद्धकोष्ठता म्हणजेच Constipation होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमी होणे. पाण्याच्या कमीमुळे आतड्यामधील मल सुकायला लागते आणि मलत्याग करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. बद्धकोष्ठता उपाय करण्यासाठी रुग्णाला भरपूर पाणी प्यायले पाहिजे आणि जेवताना पाणी पिणे कटाक्षाने टाळले पाहिजे.

बद्धकोष्ठता उपाय करण्यासाठी तुम्ही खालील 10 घरगुती उपाय करू शकता

Kabz / Constipation Home Remedies in Marathi

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रुग्णाने फळामध्ये पपई आणि पेरू आवश्य सेवन केले पाहिजे.

पोटामध्ये जमा झालेले मल बाहेर काढण्यासाठी 1 कप कोमट पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून सेवन करावे.

बद्धकोष्ठते पासून वाचण्यासाठी किंवा त्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास गरम दुध रात्री झोपण्या अगोदर प्यावे. जर मल आतड्याला चिटकत असेल तर दुधा मध्ये 1 किंवा 2 चमचे अरंडी तेल मिक्स करावे.

इसबगोल बद्धकोष्ठता मध्ये रामबाण उपाय म्हणून काम करते. 125 ग्राम दही त्यामध्ये 10 ग्राम इसबगोल पावडर मिक्स करून सकाळ संध्याकाळ खाण्यामुळे आराम मिळतो.

बेकिंग सोडा ज्यास आपण खाण्याचा सोडा बोलतो त्यामुळे देखील बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मदत होते. 1/4 कप गरम पाण्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा मिक्स करून प्यावे.

पोटाच्या आजारा पासून वाचण्यासाठी आणि त्याच्या उपचारासाठी पोटामध्ये चांगले बैक्तेरीया असणे आवश्यक आहेत. दही खाण्यामुळे शरीरामध्ये चांगले बैक्तेरीया वाढतात. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी दिवसातून 2 ते 3 कप दही सेवन करावे.

अर्धा ग्लास कोबीचा ज्यूस पिण्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळते. पालकचा ज्यूस देखील फायदेशीर ठरतो.

एक ग्लास गरम दुधा मध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा तूप मिक्स करून रात्री झोपण्याच्या अगोदर प्यावे.

एक ग्लास दुधा मध्ये थोडे अंजीर उकळवून रात्री झोपण्याच्या अगोदर प्यावे.

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाण्यामध्ये दोन चमचे मध मिक्स करून पिण्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.


Show More

Related Articles

Back to top button