health

रनिंग संबंधीचे गैरसमज

रनिंग करणे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. यामुळे हृदय गती, ब्लडप्रेषर आणि शुगर चा स्तर संतुलित राहतो. त्याच सोबत रंनिग आपल्या शरीराच्या सर्व मसल्स मजबूत करतो. हे सर्वाना माहीत आहे पण रनिंग च्या बद्दल काही गैरसमज देखील लोकांना आहेत. या गैरसमजुतीमुळे लोकांची रनिंग प्रभावित होते. चला पाहू रनिंग बद्दल कोणते गैरसमज लोकांना आहेत ज्यावर ते विश्वास ठेवत आहेत. ज्यामुळे त्यांना रनिंगचा फायदा पूर्ण मिळू शकत नाही.

साधारण स्ट्रेच केले पाहिजे : अनेक लोक रनिंग अगोदर साधारण स्ट्रेच करतात, जसे आपले हाताने पायांचे पंजे स्पर्श करणे इत्यादी. ज्यामुळे शरीराच्या सर्व मसल्स स्ट्रेच होतील आणि लोक हे सर्व यासाठी करतात कारण त्यांना वाटते की असे केल्यामुळे त्यांना फायदा होईल. पण साधारण स्ट्रेच केल्यामुळे तुमचे न्यूरोमस्कुलर सिस्टम रक्षात्मक होते आणि मसल्स वर दबाव पडत नाही. यासाठी रनिंग वर जाण्या अगोदर ग्लुट ब्रिज किंवा चाइल्ड पोज ब्रेथिंग सारखे डायनामिक वार्म-अप केले पाहिजे.

सामान्य गती ने रनिंग केली पाहिजे : सामान्यतः लोकांना वाटते की रनिंग करताना सामान्य वेग ठेवला पाहिजे, कारण यामुळे जास्त आणि लांब रनिंग करू शकाल आणि यामुळे जास्त फायदा मिळेल. पण असे मानणे चुकीचे आहे, कारण रनिंग साठी तुम्हाला आपल्या ट्रेनिंगचा 20% हिस्सा आपल्या पूर्ण ताकतीने धावले पाहिजे. तेव्हाच तुमच्या शरीराची हृदय गती आणि रक्तप्रवाह सामान्य गती पेक्षा वेगळा चालतो आणि फायदा मिळतो.

कूल डाउन केल्याने आरोग्यास फायदा : लोकांचे असे मानणे आहे की रनिंग केल्यानंतर कमी गतीने जॉगिंग केल्याने कूल डाउन लैप केला पाहिजे यामुळे आरोग्यासाठी फायदा होतो. पण कूल डाउन लैप केल्यामुळे आरोग्यासाठी काहीही फायदा नाही. हे फक्त तुमच्या रक्तप्रवाह आणि हृदय गतीला हळूहळू सामान्य करण्यास मदत करतो. रनिंग अगोदर केलेले वार्म-अप तुमच्या मसल्सची सूजण्याची शक्यता कमी करतो.

कोणत्याही पध्दतीचे शूज घातले तरी चालतात : हा सुध्दा एक गैरसमज आहे आणि सोबतच आपल्याला दुखापत करून देणारा आहे. खरेतर तुम्हाला आरामदायक आणि टाईट शूज वापरले पाहिजेत. असे केल्यामुळे तुम्ही जास्त वेळ रनिंग करू शकता आणि पायाला इजा होणे, मुरगळने इत्यादी समस्या होण्याची शक्यता कमी होते.

रनिंग करण्याचा एक खास पोश्चर असतो : अनेक लोक असे मानतात की रनिंग करताना तुमचा एक खास पोश्चर असला पाहिजे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण एका पद्धतीने रनिंग केल्यामुळे मिळणारा प्रभाव कमी दिसून आला आहे. प्रोफेशनल रनर लोकांची आपली एक पध्दत असते, ज्यामुळे ते आरामदायक स्थिती मध्ये जास्त वेळ रनिंग करू शकतात. रनिंग करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की रनिंग करताना तुमच्या कंबरेची स्थिती सरळ असावी.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सकाळी उठल्या पासून ते झोपे पर्यंत पालन करा हे 9 नियम, नेहमी रहाल निरोगी


Show More

Related Articles

Back to top button