health

1 मिनिटात करा सर्दीचा घरगुती उपाय

आता वातावरण बदलाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्दी होण्याची समस्या अनेकांना झाली आहे किंवा होण्याची शक्यता आहे. सर्दी झाल्यामुळे आपल्याला फार त्रास होतो. सर्दीमुळे डोकेदुखी, अंगदुखी, ताप येणे आणि खोकला होणे यासामस्या पण होतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत त्यामुळे सर्दी मध्ये त्वरित आराम मिळतो. चला पाहूया काय आहे हे उपाय.

सर्दीचा घरगुती उपाय

जिरे हे आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून स्वयंपाकघरात वापरतो पण यामध्ये असलेले औषधी गुण सर्दीवर 1 मिनिटात आराम देण्यास समर्थ आहेत. तुम्हाला जर सर्दीचा त्रास होत असेल तर एक चमचा कच्चे जीरे चावून खावे. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. असे तुम्ही दिवसातून 3-4 वेळा कच्चे जीरे खावू शकता.

तुम्ही जीरे चहा करून सुद्धा पिऊ शकता. हे बनवण्यासाठी 2 कप पाण्यामध्ये एक चमचा जीरे घालून पाणी उकळवा, पाणी उकळल्या नंतर यामध्ये थोडे अद्रक बारीक करून टाका, 8-9 तुळशीची पाने टाका आणि पाणी पुन्हा उकळवा. यामध्ये दुध टाकू नये. नंतर हा चहा / काढा गाळून गरम प्यावा.

जर तुम्हाला सर्दी सोबत खोकला झाला असेल तर हळद, तुलसीची पाने, अद्रक टाकून दुध तयार करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

वरील टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर पेज लाईक करा आणि आपल्या मित्रांच्या सोबत शेअर करा. धन्यवाद.


Show More

Related Articles

Back to top button