health

मुरुमांच्या पासून सुटका मिळवण्यासाठी उपाय

Acne on skin म्हणजेच चेहऱ्यावरचे मुरुमे हे सर्वात जास्त त्रास देणारी त्वचे संबंधीची समस्या आहे. यामुळे तुमच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते सोबतच चेहऱ्याचा लुक खराब होतो. परंतु मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक उपाय करू शकता. लवंगाचे तेल मुरुमांपासून सुटका मिळवून देण्यासाठी चांगला उपाय आहे. एंटी बैक्टीरियल गुण असल्यामुळे त्वचेची रोम छिद्रे साफ करण्यासाठी मदत होते आणि त्वचेवरील मुरुमांना नियंत्रित करू शकते. त्वचेवर तेल जास्त निर्माण झाल्यामुळे मुरुमांचा त्रास होतो. यामुळे त्वचेची रोमछिद्रे बंद होतात आणि त्वचेवर मुरुमांचा त्रास सुरु होतो. लवंग मध्ये एंटीसेप्टिक गुण असतात ज्यामुळे मुरुमाना घालवण्यासाठी मदत होते. चला पाहू लवंगाचे तेल कसे मुरुमांचा त्रास कमी करते.

लवंगाचे तेल कसे मुरुमांपासून सुटका देते.

  • लवंगाचे तेल आणि नारळाचे तेल
  • लवंगाचे तेल आणि ऑलिव ऑइल
  • लवंगाच्या तेलाने मसाज
  • फाउंडेशन सोबत लवंगाचे तेल
  • मोईश्चराइजर सोबत लवंग तेल.

लवंगाचे तेल आणि नारळाचे तेल

सर्वात पहिले बंद रोमछिद्रे उघडण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर वाफ घ्यावी. आता एक चमचा खोबरेल तेला मध्ये लवंग तेलाचे 2-3 थेंब मिक्स करा. यास आपल्या चेहऱ्यावर लावून 10 मिनिट मालिश करा. आता ऑइलफ्री क्लिंजरने चेहरा व्यवस्थित धुवून घ्या. यामुळे घाण आणि तेल चागले स्वच्छ होईल.

लवंगाचे तेल आणि ऑलिव ऑइल

एक छोटा चमचा ऑलिव ओईल घेऊन यामध्ये 3-4 थेंब लवंग तेल मिक्स करा. हे मिश्रण सर्कलर मोशन मध्ये आपल्या चेहऱ्यावर मालिश करा. यानंतर 10 मिनिट तसेच ठेवा आणि नंतर चेहरा एका ओईल फ्री फेश वॉश ने धुवून घ्या. यामुळे तुम्हाला स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत करेल.

लवंग तेलाने मसाज

आपल्या ओईल फ्री क्लिंजर मध्ये लवंग तेल मिक्स करा. आता नेहमी चेहरा धुण्यासाठी या फेश वॉशचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावर असलेले बैक्टीरिया साफ होतील आणि तुमच्या चेहऱ्यावरचे मुरुमे कमी होतील.

फाउंडेशन सोबत लवंग तेल

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे असतील तर तुम्हाला चेहऱ्यावर फाउंडेशन लावताना जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लवंग तेलाचे 2 थेंब फाउंडेशन मध्ये टाकून मिक्स करा. आता चेहऱ्यावर व्यवस्थित फाउंडेशन लावा. यामुळे चेहऱ्यावर बैक्तीरीया वाढणार नाहीत आणि मुरुमे कमी होण्यास मदत होईल. परंतु झोपण्या अगोदर चेहऱ्यावरील मेकअप काढणे विसरू नका.

मोईश्चराइजर सोबत लवंग तेल

आपल्या चेहऱ्याला ओईल फ्री क्लिंजरने साफ करा. आता मोईश्चराइजर सोबत लवंग तेल मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर बैक्तीरीया वाढणार नाहीत आणि मुरुमे कमी होण्यास मदत होईल.


Show More

Related Articles

Back to top button