पेन्सिल, मार्कर किंवा अगदी पर्मनंट मार्करचे भिंतीवरचे डाग दूर करा फक्त 1 मिनिटात ते देखील कोणतीही मेहनत न घेता

आपल्या घरामध्ये लहान मुले असली किंवा कधी कधी शेजारची किंवा पाहुणे लहान मुले घरात आली कि त्यांच्या चित्रकलेचा छंद आपल्या संदर भिंतीच्या रंगावर उफाळून येतो. आणि मंग त्यांच्या हाता मध्ये पेन्सिल, मार्कर किंवा अगदी पर्मनंट मार्कर जे काही हाताला लागेल त्याने भिंतीवर चित्रकला करण्यास सुरुवात करतात. अश्यावेळी आपण मुले लहान असल्याने कितीही त्यांना समजावून सांगितलं तरी त्यांना भिंतीवर चित्रकला करण्यास जास्त आवडते आणि हे प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक व्यक्ती सोबत झालेलं असत. अगदी आपण लहान होतो तेव्हा आपण देखील हेच केलेलं असत. काय बरोबर आहे ना?

मंग घरातील मोठ्या लोकांना प्रश्न पडतो कि आपल्या चिमुरड्यांना चित्रकला तर सुंदर केली आहे पण इतरांना ती समजण्या पलीकडची आहे त्यामुळे यास पुसून भिंतीला पूर्वी प्रमाणे कसे करावे. अश्यावेळी जर आपल्या घरामध्ये वॉशेबल कलर लावलेला असेल तर आपण सहज त्यास पुसून रंग पूर्वी प्रमाणे करू शकता पण तरी देखील मनात प्रश्न येतो कि कोणते साहित्य वापरून पेन्सिल आणि मार्करचे डाग निघून जातील तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला जी टिप्स सांगत आहोत त्यामुळे अगदी सहज कोणतीही मेहनत न घेता मार्कर, पेन्सिल आणि पर्मनंट मार्करचे डाग निघून जातील तर चला पाहू कसे हे डाग दूर करता येतील.

मार्कर आणि पर्मनंट मार्करचे डाग दूर करण्याची पद्धत

आपल्याला भिंतीवरचे मार्कर आणि पर्मनंट मार्करचे डाग दूर करण्यासाठी टूथपेस्ट, व्हिनेगर, पाणी, साबण, पावडर यापैकी कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे तर आपण फक्त नेलपेंट रिमूव्हर च्या मदतीने मार्कर आणि पर्मनंट मार्कर यांचे डाग दूर करू शकता. आपल्याला माहीत आहेच कि नेलपेंट रिमूव्हर काही वेळाने हवे मध्ये उडून जातो त्यामुळे याचे भिंतीवर डाग देखील राहत नाहीत. आपल्याला मार्कर आणि पर्मनंट मार्करचे डाग दूर करण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर एका कापसाच्या बोळ्यावर घ्यायचा आहे आणि हलकासा जोर लावून डाग असलेल्या जागी रब करायचे आहे. जसे आपण डाग नेलपेंट रिमूव्हर ने घासण्यास सुरुवात कराल आपल्या लक्षात येईल कि डाग दूर होत आहेत. नेलपेंट रिमूव्हर कापसावर घेऊन डाग दूर होत नाहीत तो पर्यंत भिंतीवर रब करा त्यानंतर कोरड्या कापसा ने किंवा कपड्याने भिंत पुसून घ्या. तसेही नेलपेंट रिमूव्हर हवेत उडून जाईल आणि आपली भिंत कोरडी होईल. तसेच भिंती वरचे डाग दूर होतील.

शिसपेन्सिल किंवा पेन्सिलचे डाग दूर करण्याची पद्धत

पेन्सिलचे डाग दूर करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज पडतच नाही पण तुम्हाला जर हि पद्धत माहीत नसेल तर तुम्हाला पेन्सिलचे डाग कसे दूर करावे याची काळजी वाटू शकते. तर आपल्याला भिंतीवर पेन्सिलचे डाग असतील तर त्यास आपण पेन्सिलच्या खोडरबर ने दूर करू शकता. यासाठी चांगल्या क्वालिटीचा पेन्सिलचा रबर जो काळे डाग सोडत नाही तो घ्यावा आणि भिंतीवरील पेन्सिलचे डाग असलेल्या ठिकाणी रगडून डाग दूर करावेत.

crayons marks (खडूच्या पेन्सिलचे रंग) कसे दूर कराल

यासाठी आपण ज्या ठिकाणी भिंतीवर खडूच्या पेन्सिलचे डाग आहेत ते हेयर ड्रायरच्या मदतीने एक मिनिट गरम करा त्यानंतर कोरड्या कपड्याने डाग पुसून घ्या. एकदा पुसल्या नंतर देखील डाग थोड्या प्रमाणात राहिले असतील तर पुन्हा एक मिनिट डाग गरम करा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. आपल्या भिंतीवरचे डाग दूर होतील.

या टिप्स आपण मोठ्या प्रमाणात डाग दूर करण्यासाठी वापरण्याच्या अगोदर छोट्याश्या डागावर करून पहा आणि याचा रिजल्ट आपल्या भिंतीवर कसा मिळतो हे पाहिल्या नंतर संपूर्ण भिंतीवरचे डाग वापरण्यासाठी पद्धत वापरा कारण आपण लावलेल्या रंग प्रकारा अनुसार मिळणारे परिणाम वेगवेगळे असू शकतात त्यामुळे पहिले सैम्पल टेस्ट करून पाहणे उत्तम राहील.

आपल्याला आमच्या टिप्स आवडल्या असतील तर आपण ही पोस्ट लाईक आणि शेयर करू शकता ज्यामुळे या टिप्सचा फायदा इतरांना देखील मिळू शकतो. आमचे फेसबुक पेज आपण लाईक केले नसेल तर ते लाईक करावे कारण अश्याच उपयोगी टिप्स आम्ही आपल्या सोबत नेहमी शेयर करत असतो.