एल्युमिनियम ची काळी मळकी भांडी नव्या सारखी चमकदार करण्यासाठी वापरा ही पद्धत

0
29

एल्युमिनियम ची भांडी कितीही प्रयत्न केला तरी देखील तळाला बाहेरून काळी होतातच आणि प्रत्यक महिलेला असे वाटते कि आपली एल्युमिनियमची भांडी आपण नवीन खरेदी केल्यावर जसे चमकदार स्वच्छ असतात तशीच ती कायम राहावीत. तर चला आज आपण जाणून घेऊ एल्युमिनियम ची भांडी चमकदार करण्यासाठी काय केलं पाहिजे.

येथे आपण एल्युमिनियमची काळी कढई स्वच्छ कशी करता येईल हे उदाहरण म्हणून घेऊ अगदी अशीच पद्धत आपण दुसऱ्या भांड्यांसाठी देखील वापरू शकता. कढई स्वच्छ करण्यासाठी कढई गैस वर ठेवा आणि त्यामध्ये तीन ग्लास पाणी घाला. आता यामध्ये कोणतेही डिटर्जेंट पावडर टाका कोणताही जो आपण आपल्या घरा मध्ये वापरत असाल तो.

डिटर्जेंट पावडर आपल्याला दोन टेबल स्पून यामध्ये टाकायची आहे. जर आपली कढई खालून अतिशय खराब झाली आहे आणि बऱ्याच काळापासून आपण यास स्वच्छ केले नाही तर आपण यामध्ये तीन टेबल स्पून डिटर्जेंट पावडर टाकू शकता.

हे पण वाचा : बिना रगडता बिना मेहनत तांब्याची भांडी चुटकीसरशी चमकदार करायची तर हा उपाय करा

एक चमचा मीठ टाकून यास व्यवस्थित ढवळा. आणि चार ते पाच मिनिट हे पाणी उकळू द्यावे. यासाठी आपल्याला तीन ते चार वेळा पाणी वर पर्यंत आणावे लागेल त्यासाठी आपण मोठ्या आचेवर (हाय फ्लेम) वर पाणी वर आणू शकता त्यानंतर स्लो करा. पाणी खाली गेले कि पुन्हा हाय फ्लेम करा. असे तीन ते चार वेळा वर खाली करा.

असे केल्यामुळे पाणी वर पर्यंत येईल आणि वरच्या बाजूला जी घाण असेल ती साफ होईल हा अतिशय आश्चर्यकारक फॉर्म्युला आहे. आपण एकदा आवश्य करून पहा आणि पाणी उकळू द्या.

आता यामध्ये एक लिंबाचा रस मिक्स करा. जर आपल्याकडे लिंबू नसेल तर आपण व्हाईट व्हिनेगर जे आपण चायनीज पदार्था मध्ये टाकतो ते. दोन टेबल स्पून मिक्स करा. ते देखील लिंबूरसा प्रमाणेच काम करते.

लिंबाचे साल फेकू नका याने आपण बाहेर आणि आतून कढाई क्लीन करू. लिंबाच्या सालीने एल्युमिनियम अत्यंत सुंदर स्वच्छ होते. आता पाणी दोन ते तीन वेळा वर येऊ द्या. ज्यामुळे कढाई वर पर्यंत व्यवस्थित स्वच्छ होईल.

पाच मिनिटांनी गैस बंद करा आणि पाणी एका वेगळ्या भांड्यात काढा ज्यामध्ये आपण कढई बाहेरून व्यवस्थित डीप करू शकू. ज्यामुळे कढईच्या मागील म्हणजेच बाहेरून तळाकडील आणि आजूबाजूचा भाग व्यवस्थित डीप होईल.

ज्या भांड्यामध्ये आपण पाणी काढले आहे त्यामध्ये कढई पंधरा मिनिटे बुडवून ठेवा ज्यामुळे कढईच्या खाली असलेला चिकट काळा मळ सॉफ्ट होईल. आणि त्याचा काळेपणा हळूहळू स्वच्छ होईल. यानंतर आपण स्क्रब वापरून ते अगदी सहज क्लीन करू शकतो.

पंधरा मिनिटा नंतर एक चमचा डिटर्जेंट पावडर मध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करा. बेकिंग सोडा एक नेचुरल क्लीजर आहे जे आपल्या कढाई वरून काळेपणा बऱ्याच प्रमाणात काढेल.

आता आपण स्टीलचे स्क्रबर घ्या जर स्टीलचे स्क्रबर नसेल तर एल्युमिनियम फॉयल घ्या. ज्यामध्ये आपण अन्न पदार्थ पैक करतो. एल्युमिनियम फॉयलचा बॉल बनवा आणि त्याने व्यवस्थित घासून कढई स्वच्छ करा.

जेव्हा स्क्रबर परिणामकारक वाटत नसेल तर सैंड पेपर घ्या जे पेंटर भिंत घासण्यासाठी वापरतात. हे कोणत्याही स्क्रबर पेक्षा उत्तम काम करते. सैंड पेपर वापरून एकावेळीतच कढई स्वच्छ होते.

जेथे स्क्रबर किंवा सैंड पेपर पोहचू शकत नाही तेथे चाकू किंवा दुसरे साहित्य वापरून तेथील घाण खरवडून काढा. यानंतर कढई पाण्याने स्वच्छ धुवा. नंतर आपण जे लिंबाचे साल ठेवले होते त्याच्या मदतीने डिटर्जंट पावडर लावून कढई घासा यामुळे एल्युमिनियम ची कढई पांढरी आणि चमकदार होईल आणि एकदम नव्या सारखी दिसायला लागेल.