food

1 वर्षा पर्यंत कोथिंबीर या पद्धतीने टिकवा

1 वर्षा पर्यंत कोथिंबीर कशी टिकवायची हे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित हे अशक्य वाटले असेल पण आम्ही सांगत असलेल्या पद्धतीने हे शक्य आहे. बऱ्याच वेळा कोथिंबीर बाजारामध्ये आपल्याला स्वस्त मिळते आणि आपण ती घरी जास्त आणतो. पण ती एक ते दोन दिवसात खराब होते. पण आता नाही होणार कारण आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर पाहूयात कोथिंबीर 1 महिना ते 1 वर्ष साठवून ठेवण्याच्या पद्धती.

कोथींबीर एक महिन्या पर्यंत टिकवण्यासाठी

वरील फोटो प्रमाणे कोथींबीर प्लास्टिकच्या मदतीने कव्हर करा आणि कोथींबीरची मुळे भिजतील एवढे पाणी एका भांड्यात घेऊन कोथींबीर त्यामध्ये उभी करा. तत्पूर्वी बाजारातून कोथींबीर आणल्यावर तिच्यामध्ये कोणतेही खराब पान नाही याची खात्री करा. जर खराब पाने असतील तर ती काढून वर सांगितलेली टिप्स वापरा.

कारण म्हणतात ना एक नासका आंबा पूर्ण पेटी नासवतो तसेच कोथंबीरच्या बाबतीत होते. एक महत्वाची टीप म्हणजे भांड्यात अगदी थोडे पाणी घ्या वरील फोटो प्रमाणे. अश्या पद्धतीने तुम्ही एक महिन्या पर्यंत कोथींबीर साठवून ठेवू शकता. कोथींबीर वापरण्यास घेताना प्रत्येक वेळी ती चेक करा जर एखादे पान खराब झाले असेल तर ते पान काढून टाका.

कोथींबीर एक महिन्या पर्यंत टिकवण्यासाठी दुसरी पद्धत

यापद्धती मध्ये तुम्हाला दररोज जेवढी कोथिंबीर लागते तेवढ्या मापाच्या लहान लहान जुड्या बनवून त्या टिश्यू पेपर किंवा कोणत्याही पेपर मध्ये गुंडाळून एअर टाईट डब्यात ठेवायच्या आणि हा डबा फ्रीज मध्ये ठेवायचा. रोज तुम्हा यातील एक एक जुडी तुमच्या वापरासाठी काढाव्यात. जर डब्यातील जुड्यांचे पेपर जास्त ओले झाले तर ते बदलावेत.

1 वर्षा पर्यंत कोथिंबीर टिकवण्याची पद्धत

यापाद्ध्तीचा वापर करून तुम्ही कोथींबीर 6 महिने ते 1 वर्षा पर्यंत साठवून ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला कोथिंबीर कापून तिला आइस ट्रे मध्ये भरावे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकावे आणि नंतर फ्रीजरमध्ये ठेवून त्याचे आइस क्यूब तयार करावेत. यामुळे कोथींबीर 6 महिने ते 1 वर्षा पर्यंत चांगली राहते. दररोज तुम्हाला पाहिजे तेवढे आइस क्यूब काढून पदार्थांमध्ये कोथींबीर वापरावी.


Show More

Related Articles

Back to top button