Bollywood

सुपरहिट फिल्म देऊन देखील नंतर चंकी पांडेला काम मिळत नव्हते, शेजारच्या देशात करावे लागले काम

बॉलिवूड फिल्म पाहणाऱ्या जवळपास सगळ्या प्रेक्षकांना चंकी पांडे हे नाव ओळखीचे आहे. आपल्या अभिनयाने सुरुवातीला चंकी पांडे ने यश मिळवलेलं आपल्याला माहीत आहे त्यानंतर बरेच वर्ष तो बॉलिवूड मध्ये जवळपास कोणत्याच फिल्म मध्ये दिसला नाही. परंतु सध्या त्याच्या विनोदी भूमिका लोकांच्या चांगल्याच पसंतीस येत आहेत.

आता चंकी पांडे फिल्म ‘प्रस्थानम’ मुळे पुन्हा चर्चेत आला आहे. या फिल्म मध्ये संजय दत्त, मनीषा कोइराला, जैकी श्रॉफ, अमायरा दस्तूर, अली फजल आणि सत्यजित दुबे हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत. सध्या चंकी पांडे सह कलाकार म्हणून दिसत असला तरी त्याने अनेक चित्रपटा मध्ये मुख्य भूमिका केलेल्या आहेत.

चंकी पांडे याचा फिल्मी जगातील प्रवास सुखमय नव्हता त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यांच दरम्यान त्याला बॉलिवूड व्यतिरिक्त अनेक बांगलादेशी फिल्म केल्या. चंकी पांडे ने हल्लीच पीटीआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखती मध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्या सोबतच फिल्मी आयुष्या बद्दल चर्चा केली.

चंकी सांगतो कि आँखे सारखा सुपरहिट चित्रपट केल्या नंतर देखील त्याला दीर्घकाळ रिकामे बसावे लागले. त्यास कोणतेही काम मिळत नव्हते. जवळपास एक वर्ष तो घरी बसला होता. त्याच्या जवळ फक्त एक फिल्म होती ज्याचे नाव ‘तिसरा कौन’ होते.

चंकी पांडे ने पुढे सांगितले जेव्हा मला बांग्लादेशी फिल्म मध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा माझी पहिलीच फिल्म सुपरहिट राहिली. मी तेथे तीन ते चार वर्ष काम केले होते.

चंकी ने सांगितलं ‘लग्ना नंतर माझ्या पत्नी ने मला सांगितलं माझी खरी ओळख बॉलीवूड आहे. तेव्हा मी पुन्हा हिंदी फिल्म मध्ये परतलो आणि तेव्हा मला समजलं कि आजची पिढी मला विसरत चालली आहे.’

त्याचा वेळी मी संघर्ष करणे सुरु केले आणि काम मागण्यासाठी लोकांची भेट घेतली. नशिबा ने मला लवकरच काम मिळालं. चंकी पांडे ने म्हणतो सुभाष घई, हैरी बावेजा आणि साजिद नाडियादवाला या फिल्ममेकर्स ने बॉलिवूड मध्ये कमबैक करण्यासाठी त्याची मदत केली.

चंकी पांडे म्हणतो ‘तुम्ही डिप्रेशन मध्ये जात जेव्हा बिना काम तुम्ही घरी बसता आणि तेही तेव्हा जेव्हा तुम्ही टॉप वर असता.’ चंकी म्हणतो वाईट काळ दूर करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवणे आहे.’ या व्यतिरिक्त देखील चंकी पांडे ने भरपूर काही आपल्या मुलाखती मध्ये सांगितलं आहे.

वाचा Bollywood सगळ्यांत पहिले मराठी गोल्ड वर.
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close