भारतीयांना मिळणार ई-पासपोर्ट: मोदी

पेपर पासपोर्ट हा प्रकार लवकरच इतिहास होऊन त्याची जागा चिपवर आधारित ई-पासपोर्ट घेणार आहे. केंद्र सरकार एका मध्यवर्ती पासपोर्ट प्रणालीवर काम करत असून, या प्रणालीअंतर्गत जगभरातील दूतावास आणि भारतीय राजदूतावासामार्फत ई-पासपोर्ट वितरित केले जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते वाराणसी येथे प्रवासी भारतीय दिन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.

जगभरात असलेले भारतीय राजदूतावास आणि दूतावासांना पासपोर्ट सेवा प्रकल्पाशी जोडले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. याबरोबरच, केंद्र सरकार पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन (पीआयओ) आणि ओव्हरीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डासाठी व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेचं सुलभीकरण करण्यावर काम करत असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

जगात जेथे कुठे भारतीय राहात असतील, तेथे त्यांनी आनंदी आणि सुरक्षित राहावे हाच आमचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान म्हणाले. परदेशात सुमारे २ लाखांहून अधिक भारतीयांना विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे. गेल्या साडे चार वर्षांपासून सरकार त्यांची मदतही करत असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन केले होते. यावेळी सुमारे ५ हजार प्रतिनिधींनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here