हा चिमुकला लहान मुलगा चालवतो वडिलांनी बनवलेली Electric Royal Enfield, पहा व्हिडीओ

आंध्र प्रदेशातील टीव्ही चैनल ईटीव्ही ने एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये दिसत आहे कि एक व्यक्ती ने आपल्या मुलांसाठी एक मिनी रॉयल एनफिल्ड बनवली आहे. खरंतर ही बातमी केरळ राज्यातील कोल्लम ची आहे. व्हिडीओ मध्ये हे देखील दिसत आहे कि एक 5-7 वर्षाला मुलगा मिनी रॉयल एनफील्ड बाइक चालवत आहे. ही बाइक हुबेहूब ओरिजिनल रॉयल एनफिल्ड चे छोटे रूप वाटत आहे.

व्हिडीओ पाहिल्यावर समजत कि ही मिनी बुलेट पूर्णतः फायबर पासून बनवलेली आहे. यामध्ये एक हेडलैम्प, सिंगल पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि दुसऱ्या वस्तू लावलेल्या आहेत. एवढंच नाही तर या मिनी बुलेटच्या फ्युल टैन्क वर रॉयल एनफिल्डचा लोगो देखील लावलेला दिसत आहे. या छोट्या बुलेट मध्ये मिरर, इंडिकेटर, लेग गार्ड देखील लावलेले आहेत. व्हिडीओ मध्ये दिसत कि मुलाचे वडील देखील रॉयल एनफिल्ड चालवतात.

आजकाळ लोकांमध्ये रॉयल एनफिल्ड बद्दल कमालीची क्रेज वाढलेली आहे. त्यामुळे कंपनी या बाईकचे नवीन मॉडल देखील लॉन्च करत आहे. हल्लीच काही दिवसा पूर्वी कंपनी ने कमी किमतीची Royal Enfield Classic 350 S लॉन्च केली होती.