People

भारतात येथे राहणाऱ्या लोकांना का आहे लिव इन मध्ये राहून मुले जन्मास घालणे जरुरी, तुम्हाला धक्काच बसेल

आपण मराठी लोक आणि सामान्य भारतीय लिव इन मध्ये राहणाऱ्या कपल्स ला रेस्पेक्ट देत नाही. आपण त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत असे म्हणतो. पण जर तुम्हाला म्हंटले की भारतामध्ये एक असे राज्य आहे जेथे लिव इन मध्ये राहणे आणि मुले जन्माला घालणे आवश्यक आहे तर तुमचा या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही. पण हे खरे आहे आणि हे राज्य आहे राजस्थान येथे एक असा समाज (जमात) आहे जो या प्रथेला शेकडो वर्षा पासून फॉलो करत आहे. चला आज पाहू यांची ही प्रथा आहे कशी.

गरसिया जमाती मध्ये आहे अशी प्रथा

ही प्रथा पाळणारे लोक राजस्थानच्या गरसिया जमातीचे लोक आहेत. या जातीच्या लोकांचे मानने आहे की 100 पेक्षा जास्त वर्षा पूर्वी पासून आमचे पूर्वज ही प्रथा फॉलो करत आहेत. ज्यामध्ये भविष्यात लग्न करणाऱ्या जोडप्याला एकत्र एका घरामध्ये लिव इन रिलेशनशिप मध्ये राहावे लागते आणि मुल जन्माला आल्या नंतरच त्यांचे लग्न लावून दिले जाते. आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की या जोडप्याला जर वाटले तर ते लग्न करण्यास नकार देखील देऊ शकतात. प्रथा ही आहे की जर लिव इन च्या दरम्यान मुल जन्माला आल्या नंतर वाटल्यास लग्नाला नकार देऊन यानंतर ते दोघे वेगळे होऊ शकतात आणि मग कोणत्याही दुसऱ्या सोबत भविष्याचे प्लानिंग करू शकतात.

महिलांना दिला जातो खास सन्मान

या जाती मध्ये महिलांना विशेष आदर दिला जातो आणि त्यांना पुरुषांच्या पेक्षा जास्त अधिकार असतात. येथून आज पर्यंत बलात्कार आणि महिला उत्पीडन सारख्या तक्रारी समोर आल्या नाहीत. येथील लोक हुंडा प्रथेला मानत नाहीत. यांचे संपूर्ण जीवन मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे. या समाजाचे लोक तेव्हाच विवाह करतात जेव्हा यांच्याकडे भरपूर पैसा येतो. या समाजात लग्नामध्ये लग्नाचा खर्च मुलाकडील मंडळीच करतात. पहिले कुटुंब मुलगा आणि मुलगीला सोबत राहण्यासाठी काही पैसे देतात आणि जेव्हा दोघांची लिव इन चा अवधी संपतो तेव्हा लग्नाचा निर्णय घेतला जातो आणि जर लग्नास सहमती असेल तर लग्न मुलाच्या घरीच केले जाते आणि संपूर्ण खर्च मुलाचे कुटुंब करते.

या प्रथेला दापा प्रथा बोलले जाते

गरसिया जातीचे लोक या प्रथेला दापा प्रथा म्हणतात. येथे दोन दिवसांचा सामुहिक विवाह मेळावा भरतो ज्यामध्ये मुल मुली आपल्या पसंतीचे मुलगा किंवा मुलगी निवडतात आणि पळून जातात त्यानंतर परत येऊन लिव इन मध्ये राहतात. येथे असेही महिला आणि पुरुष येतात जे पूर्वी पण लिव इन मध्ये राहीले होते, ते येथे येण्याचे कारण की त्यांना दुसरा नवीन जोडीदार शोधायचा असतो. महिला येथे पूर्वी पेक्षा जास्त पैसे वाला जोडीदार शोधण्यासाठी येतात.

या समाजाचे लोक राजस्थान मधील उदयपुरच्या आजूबाजूच्या भागात राहतात.


Show More

Related Articles

Back to top button