People

मुंबई मधील टाटा कॅन्सर हॉस्पिटल बाहेर 27 वर्ष फ्री जेवण देणाऱ्या अवलियाची गोष्ट

मृत्यूचे दुसरे नाव कॅन्सर आहे असे म्हंटल्यास अश्योक्ती होणार नाही कारण भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक या आजाराने मरत असतात. तर जे याचे उपचार घेत असतात त्यांचे जीवन ही एखाद्या मरण यातने पेक्षा कमी नसते. कॅन्सर हा आजार कधीही आणि कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये रुग्णाची भरपूर गर्दी असते. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असतात पण त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध नाही. टाटा हॉस्पिटल बाहेरील गर्दी एक तरुण पाहत होता त्याला तेथे येणारे रुग्ण कॅन्सरने पहिलेच हतबल झालेले आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्यासाठी करत असलेला प्रयत्न बघून मना पासून वाटत होते की यांच्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे.

या तरुणाचे वय त्यावेळीस अवघे 27 वर्ष होते. ज्यावयात सामान्य तरुण स्वताच्या सुंदर भविष्याची स्वप्ने पाहतो त्यावयात हा तरुण या रुग्णांचा आणि त्यांच्या गरीब नातेवाईकांचा विचार करत होता ज्यांच्याकडे रुग्णाच्या औषधाचे सोडाच पण स्वताच्या दोन वेळच्या जेवणाचे पैसे सुध्दा नसायचे. या तरुणाची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. मंग त्याने एक दिवस धाडसी निर्णय घेतला.

त्याने एक चांगले हॉटेल भाड्यावर देऊन टाकले आणि त्याच पैशातून टाटा हॉस्पिटल समोरच्या कोंडाजी चाळीत एक उपक्रम सुरु केला जो पुढील 27 वर्ष सुरु राहीला आणि अजूनही सुरु आहे. त्या तरुणाने टाटा हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईक यांची सोय होण्यासाठी मोफत जेवण वाटप सुरु केले. त्या तरुणाचा हा उपक्रम आजूबाजूच्या लोकांना आवडल त्यामुळे लोक सुध्दा त्याला मदत करू लागले.

मोफत जेवण वाटपा नंतर या तरुणाने एक पाऊल पुढे जाऊन रुग्णांना मोफत औषध पुरवण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी औषधांची बँक उघडली. त्यामध्ये त्यांनी 3 फार्मासिस्ट व 3 डॉक्टर यांची टीम बनवली. आज या तरुणाने स्थापन केलेला जिवन ज्योत ट्रस्ट राबवत असलेल्या उपक्रमांची संख्या 60 पेक्षा जास्त आहे. या तरुणाचे नाव आहे मा.हरखचंद सावला त्यांच्या या समाज कार्याला शतशः प्रणाम.

गेली 27 वर्षात 10-12 लाख कॅन्सर रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दुपारच्या जेवणाची सोय करणाऱ्या या अवलियाचे हे कार्य सर्व गरजू आणि गरीब कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकान पर्यत पोचवण्यासाठी पोस्ट जास्तीत जास्त शेयर करा ही विनंती.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : गुळ आणि जीरा यांचे पाणी पिण्यामुळे मिळणारे फायदे अद्भुत आहे, पहा कोणते फायदे मिळतात


Show More

Related Articles

Back to top button