चांदी चे पैंजन आणि भांडी हात न लावता नव्या सारखे चमकदार बनवण्याची ही पद्धत तुम्हाला माहीत नसेल

चांदीच्या वस्तू वातावरणाच्या परिणामाने काळ्या पडतात आणि त्यांना पुन्हा चमकदार करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न आणि मेहनत घेत असाल. पण आज आम्ही तुम्हाला जी पद्धत सांगणार आहोत त्यामध्ये तुम्हाला कोणतीही मेहनत घेण्याची गरज नाही म्हणजेच घासण्याची किंवा चोळण्याची अजिबात गरज नाही. आपण आता पर्यंत चांदीच्या वस्तू, भांडी, आणि पैंजण स्वच्छ करण्यासाठी जी पद्धत वापरत असाल त्यामध्ये नक्कीच त्या वस्तूंना हाताने किंवा ब्रशच्या मदतीने घासण्याची गरज पडत असेल पण आज आम्ही तुम्हाला जी पद्धत सांगत आहोत ती समजल्यावर तुमची हि मेहनत वाचणार आहे.

आज आम्ही तुम्हाला चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहोत ज्या अतिशय परिणामकारक आणि प्रभावी असण्या सोबतच तेवढ्याच सोप्प्या आहेत. या दोन्ही पद्धती मधून मिळणार रिजल्ट जवळपास सारखाच आहे एवढा सारखा आहे कि तुम्ही दोन्ही पद्धती मधून मिळणाऱ्या रिजल्टची तुलना केली तर तुम्हाला फरक करणे कठीण जाईल. चला तर मंग जाणून घेऊ चांदीच्या वस्तू चमकदार आणि स्वच्छ करण्याच्या दोन्ही पद्धती.

चांदीचे पैंजण आणि भांडी चमकदार करण्याची पहिली पद्धत

चांदीच्या वस्तू चमकदार आणि स्वच्छ करण्याची ही पद्धत आपल्या पैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल पण त्यामध्ये देखील एक ट्रिक आहे ज्यामुळे ही पद्धत अजून जास्त प्रभावी होते. चांदीच्या वस्तू चमकदार करण्याच्या पहिल्या पद्धती मध्ये आपण टूथपेस्ट वापरून चांदी स्वच्छ चमकदार करणार आहोत. यासाठी थोडीशी पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट हातावर घ्यावी, त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून चांदीचे पैंजण हाताने घासावेत. पाच मिनिट टूथपेस्ट ने पैंजण हाताने घासल्या नंतर चमकायला लागतील पण अजून जास्त चमकावण्यासाठी आणि डिजाईन मधील काळेपणा दूर करण्यासाठी जुन्या टूथब्रश वर टूथपेस्ट लावून पाणी टाकून ब्रश ने पैंजण घासावेत. पाच मिनिट ब्रशने घासल्या नंतर थोडासा खाण्याचा सोडा टाकून देखील घासावे म्हणजे टूथपेस्ट आणि खाण्याचा सोडा एकत्र मिक्स होईल आणि हे मिश्रण जास्त प्रभावी होईल. यास ब्रश ने घासून नंतर 10 मिनिट तसेच ठेवावे. यानंतर पाण्याच्या मदतीने स्वच्छ धुवावेत. तुमचे चांदीचे पैंजण एकदम नव्या सारखे चमकदार होतील.

चांदीची भांडी आणि पैंजण किंवा इतर वस्तू चमकदार करण्याची दुसरी पद्धत

ही दुसरी पद्धत आपल्याला कदाचित माहीत नसेल पण या पद्धती मध्ये मेहनत काहीच नाही आहे घासण्याची किंवा जोर लावण्याची अजिबात गरज नाही आहे. या दुसऱ्या पद्धतीला करण्यासाठी एका स्टीलच्या भांड्यात एक ते दोन ग्लास पाणी गरम करण्यास ठेवा. जेव्हा पाणी उकळायला लागेल तेव्हा त्यामध्ये एल्युमिनियम फॉईलचे तुकडे टाका. एल्युमिनियम फॉईल ज्यामध्ये आपण अन्न पदार्थ पेकिंग करतो ती आपण वापरू शकता. हिचे तुकडे करून उकळत्या पाण्यात टाकावे आणि नंतर आपले चांदीचे पैंजण त्यामध्ये टाकावे 10 मिनिट त्यांना एल्युमिनियम फॉईल असलेल्या उकळत्या पाण्यात उकळू द्यावे. नंतर गैस बंद करून त्यास थंड होऊ द्यावे लक्षात ठेवा पैंजण पाणी थंड झाल्यावर पाण्यातून बाहेर काढायचे आहेत. यानंतर पैंजण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. आपले चांदीचे पैंजण नव्या सारखे चमकदार होतील.