relationship

पुरुष असो किंवा स्त्री आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रामुळे कोणासही करू शकता वश मध्ये

वशीकरण किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणा मध्ये करणे अत्यंत कठीण काम आहे. सगळ्यांना वाटते कि लोकांनी त्यांच्या म्हणण्या अनुसार वागावे, त्यांच्या वश मध्ये राहावे पण हे शक्य होत नाही. पण आज येथे आपण काही गोष्टी जाणून घेऊन ज्यामुळे हे असंभव कार्य देखील संभव होऊ शकते. खरतर कोणत्याही व्यक्तीला वश मध्ये केले जाऊ शकते.  याबद्दल आचार्य चाणक्य यांनी महत्वाचा मंत्र दिला आहे आणि हाच वशीकरण मंत्र आज आपण येथे पाहणार आहोत.

आचार्य चाणक्य हे एक महान ज्ञानी असण्या सोबतच एक चांगले नितीकार देखील होते. त्यांनी आपल्या निती मध्ये मनुष्याला आपले जीवन सुखमय बनवण्यासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या निती आज देखील आपल्यासाठी उपयोगी आहेत. जो व्यक्ती या नितीचे पालन करतो त्याला जीवना मध्ये सुख सुविधा आणि कार्या मध्ये यश मिळते.

आचार्य चाणक्य यांचा वशीकरण मंत्र

आचार्य चाणक्य म्हणतात –

लुब्धमर्थेन गृह्णीयात् स्तब्धमंजलिकर्मणा, मूर्खं छन्दानुवृत्त्या च यथार्थत्वेन पण्डितम्।।

म्हणजेच जो व्यक्ती धनाचा लालची आहे त्यास पैसे देऊन,  घमंडी किंवा अभिमानी व्यक्ती समोर हात जोडून, मूर्ख व्यक्तीचे म्हणणे मान्य करून आणि विद्वान व्यक्तीला सत्याने वश मध्ये केले जाऊ शकते.

आचार्य चाणक्य म्हणतात कि आपल्या आसपास अनेक प्रकारचे लोक असतात. काही धनाचे लोभी तर काही घमंडी आहेत. काही मूर्ख आहेत तर काही बुद्धिमान आहेत. या लोकांना वश मध्ये करण्यासाठी सगळ्यात सोप्पा मार्ग कोणत्याची लालची व्यक्तीला धन देऊन वश मध्ये करता येऊ शकते.

तर जे लोक घमंडी असतात त्याना हात जोडून त्यांना योग्य मानसन्मान देऊन वश मध्ये करता येऊ शकते. तर एखाद्यामूर्ख व्यक्तीला आपल्या वश मध्ये करायचे असेल तर तो व्यक्ती जसे बोलतो आपल्याला अगदी तसेच केले पाहिजे. खोट्या प्रशंसेने मूर्ख व्यक्ती वश मध्ये होतो. या व्यतिरिक्त जर विद्वान आणि समझदार व्यक्तीला वश मध्ये करण्यासाठी त्याच्या समोर फक्त सत्य बोलावे, तो तुमच्या वश मध्ये येईल.

अनेक शतके गेल्यानंतर देखील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले सिद्धांत आणि निती आपल्या जीवना मध्ये उपयोगी ठरतात कारण त्यांनी दीर्घ अभ्यास, चिंतन आणि जीवनाच्या अनुभवातून मिळवलेले अमुल्य ज्ञान पूर्ण निस्वार्थ होऊन मानवीय कल्याणाच्या उद्देशाने सगळ्यांना सांगितले आहे.


Show More

Related Articles

Back to top button