Uncategorized

सुखी जीवनासाठी एका पुरुषाने नेहमी या चार गोष्टी गुपित ठेवाव्यात

महान आचार्य चाणक्य यांना कोण ओळखत नाही, ते एक महान शिक्षण, अर्थशास्त्री, दूरदृष्टी असलेले आणि राजाचे सल्लगार होते. त्यांनी आपल्या जीवन काळात जे विचार सांगितले त्यांचा अवलंब आपण केला तर आपणास यशस्वी होण्यास मदत होईल. चाणक्य यांनी अनेक विषयावर आपल्या चाणक्यनीति मध्ये सांगितले आहे.

यामध्ये त्यांनी माणसासाठी काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी काही कामांच्या बद्दल सांगितले आहे ज्यामध्ये मनुष्याने काय केले पाहिजे आणि काय नाही हे सांगितले आहे. त्यांनी चार असे काम सांगितले आहेत जे एका पुरुषाला कधीही केले नाही पाहिजेत.

धनाची हानी झाल्या बद्दल

पहिली गोष्ट चाणक्य यांनी सांगितली ती म्हणजे कोणालाही आपल्या धनाचे झालेल नुकसान सांगितले नाही पाहिजे. जर तुम्हाला व्यापारामध्ये नुकसान होत असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुमच्या धनाचे नुकसान होत असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नये किंवा चर्चा करू नये. ही गोष्ट आपल्या पर्यंतच असू द्यावी. कारण जेव्हा तुम्ही याबद्दल कोणास याबद्दल सांगितले तर तो तुमची मदत करणार नाही तर खोटी सहानुभूती देतील आणि तुमच्या पासून दूर होतील. त्यांच्या अनुसार समाजा मध्ये गरिब लोकांना सन्मान मिळत नाही.

आपल्या व्यक्तिगत समस्या बद्दल

चाणक्य यांनी दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे व्यक्तिगत समस्या दुसऱ्यास सांगू नये, असे केल्यास तुमच्या गैरहजेरीत हे लोक तुमच्यावर हसतील. कारण कोणासही तुमच्या समस्ये बद्दल देणेघेणे नाही आहे, तुमचे दुखः दुसऱ्याला सुखाचा अनुभव देतो.

 

आपल्या पत्नीच्या चारित्र्या बद्दल

चाणक्य यांनी तिसरी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे एका पुरुषाने आपल्या पत्नीच्या चारित्र्या बद्दल कोणासही काही बोलले नाही पाहिजे. शेवटी सर्वात बुद्धिमान व्यक्ती तोच असतो जो आपल्या पत्नीच्या संबंधित कोणतीही गोष्ट कोणास बोलत नाही. जे लोक जास्त बडबडे असतात आणि आपल्या सर्व गोष्टी दुसऱ्यास सांगतात त्यास नंतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.

आपल्या पेक्षा खालील लोकांकडून झालेल्या अपमाना बद्दल

चाणक्य चवथी गोष्ट सांगतात कि एका व्यक्तीने नेहमी हे रहस्यच ठेवले पाहिजे कि त्याच्या पेक्षा खालील किंवा लहान माणसाने त्याचा अपमान केला आहे. जर या बद्दल तुम्ही लोकांना सांगितले तर ते तुमची खिल्ली उडवतील. यामुळे तुमच्या मान-सन्माना मध्ये कमी येऊ शकते. यामुळे तुमच्या आत्मविश्वासा मध्ये कमतरता येऊ शकते.


Show More

Related Articles

Back to top button