या पाच सेलेब्रेटींनी लपूनछपून केले होते लग्न, जुही चावला ने तर प्रेग्नेंट झाल्या दिलेली लग्नाची कबुली

बॉलीवूड सेलिब्रेटीच्या राजेशाही लग्नाची बातमी सगळ्यात पहिले सोशल मीडियावर वायरल होते. पण अनेक सेलिब्रेटी असे आहेत ज्यांच्या लग्नाची कानोकान खबर लागली नाही. मंग ते आपल्या काळातील स्टार विनोद मेहरा आणि रेखा असो किंवा जुही चावला आणि जय मेहता. जेव्हा लोकांना यांच्या लग्ना बद्दल समजले तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही. चला जाणून घेऊ बॉलीवूड मधील अश्या लग्ना बद्दल जी लपवली गेली होती.

रेखा आणि विनोद मेहरा : यांच्या लग्ना बद्दल बोलले जात कि विनोद मेहरा त्यांच्या आईला रेखा सोबतच्या लग्ना बद्दल सहमती घेऊ शकले नाही. जेव्हा ते कोलकाता मध्ये लग्ना नंतर रेखाला एयरपोर्ट वरून सरळ घरी घेऊन गेले आणि रेखा ने विनोद मेहरा यांच्या आईचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिला धक्का दिला. विनोद मेहरा यांच्या लाख प्रयत्ना नंतर देखील त्यांच्या आईने रेखाला स्वीकार केले नाही आणि हे नाते संपुष्टात आले.

जॉन अब्राहम आणि प्रिया रुचाल : जॉन आणि बिपाशाच्या नात्याने खूप प्रसिद्धी मिळवली. पण जॉनच्या लग्ना विषयी कोणालाही कळलं देखील नाही. प्रिया रुचाल सोबतच्या त्याच्या लग्ना बद्दल खूप उशिरा समजलं. प्रियाला तो आजही मीडिया पासून खूप लपवून ठेवतो.

जुही चावला आणि जय मेहता : जुही चावला दीर्घकाळ जय मेहताला आपला चांगला मित्र सांगत राहिली. पण बराच काळ गेल्या नंतर समजलं कि दोघे पती-पत्नी आहेत. म्हणजेच दोघांनीं लपूनछपून लग्न केले देखील होते. जेव्हा ही गोष्ट लोकांना फैन्सना समजली तेव्हा जुही आई होणार होती.

दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला : अल्पाआयुष्य लाभलेल्या दिव्या भारती ने प्रोड्युसर साजिद नाडियाडवाला सोबत लग्न केले होते. पण हे लग्न लपवून ठेवलं गेल होत. याची माहिती त्यांच्या फक्त काही मित्रांनाच होती. लग्ना नंतर 6 महिन्यांनी दिव्या रहस्यमय परिस्थितीत मृत्युमुखी झाली होती.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे एकमेकांवर प्रेम करत होते. पण धर्मेंद्र अगोदरच दोन मुलांचा बाप होता. अश्यात दोघांनीं एक मार्ग निवडला, इस्लाम धर्म स्वीकारून दोघांनीं कोणालाही न सांगता लग्न केलं.