health

तुमच्या लघवीला फेस येत आहे का? जर उत्तर होय असेल तर सावधान, कारण जीव धोक्यात टाकत आहात तुम्ही

बऱ्याच वेळा असे पाहण्यात आले आहे की काही लोकांच्या लघवीला फेस (झाग) येतो. हे लोकांना सामान्य वाटते आणि दुर्लक्ष करतात. पण, तुमच्या माहितीसाठी लघवीला फेस येणे ही गोष्ट सामान्य नाही हे लक्षात घ्या. यामागे देखील कारण आहे. लघवीला फेस येणे किंवा बुडबुडे येणे हे व्यक्तीच्या शरीरामध्ये काही गडबडी असल्याचा इशारा करते. याचे कारण अनेक असू शकतात. चलातर पाहूया याची कारणे काय आहेत आणि यामुळे काय नुकसान होऊ शकते.

लघवीला फेस येणे किंवा बुडबुडे येणेचे पहिले कारण गर्भावस्थे मध्ये महिलेच्या किडनीचा आकार वाढणे असते. डॉक्टरांच्या अनुसार गर्भावस्थे मध्ये किडनी मध्ये जास्त प्रमाणात अमीनो एसिड फिल्टर होते, ज्यामुळे लघवी मध्ये फेस दिसायला लागतो. लघवीला फेस येण्याचे दुसरे कारण डिहाईड्रेशन आहे. डिहाईड्रेशन मुळे शरीरातील पाणी कमी होते आणि लघवी घट्ट होते. ही समस्या दूर करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पाणी प्यावे. जर कोणाला सारखी सारखी लघवी येत असेल तर अश्यावेळी लघवी मध्ये फेस येणे सामान्य आहे.

अधिक प्रमाणात प्रोटीन घेतल्याने शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढते. निरोगी शरीरात प्रोटीनचे प्रमाण जास्त झाल्यानंतर ते लघवीच्या मार्गाने बाहेर निघून जाते. याकारणामुळे देखील लघवी मध्ये फेस दिसतो. याकरिता योग्य प्रमाणातच प्रोटीनचे सेवन करावे. लघवीला फेस येण्याचे तिसरे कारण शरीराची अनावश्यक तत्वाचे किडनी मध्ये प्रवास करण्या दरम्यान बनणारा फेस असू शकतो. लघवी मध्ये फेस येण्याचे चौथे कारण युरीन मध्ये इन्फेक्शन होऊ शकते. युरीन इन्फेक्शन मध्ये रोगाणु लघवीच्या मार्गे रिलीज होतात ज्यामुळे फेस होतो. युरीन इन्फेक्शन च्या उपायासाठी एंटीबायोटिक औषधे घेतली पाहिजेत.

जर तुमच्या लघवी मध्ये फेस येत असेल तर हे किडनी खराब होण्याचे लक्षण असू शकते. अश्या स्थिती मध्ये कोणत्याही चांगल्या विशेषज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि योग्य उपचार करावा. तुम्ही पाहिले असेल की डॉक्टर कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी लघवीच्या तपासणीची मागणी करतात. खरेतर कोणत्याही व्यक्तीच्या लघवीच्या रंग आणि दुर्गंधीने त्याचे आरोग्य कसे आहे हे समजते. जर तुमच्या लघवी मध्ये फेस कधीकधी येत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. पण जर हे नियमित अनेक दिवस होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.


Show More

Related Articles

Back to top button