Connect with us

रात्रीच्या वेळेस केळं खाणं आरोग्याला खरंच त्रासदायक ठरते का ?

Food

रात्रीच्या वेळेस केळं खाणं आरोग्याला खरंच त्रासदायक ठरते का ?

बारमाही सहज उपलब्ध होणार्‍या एका फळामध्ये ‘केळ्याचा’ समावेश होतो. केळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. पचनाचा त्रास कमी करण्यासाठी, पित्त कमी करण्यासाठी  केळं फायदेशीर आहे. केळ्यात अनेक पोषक घटक आहेत. पोषणघटकांसोबतच अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असल्याने त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

 आरोग्यदायी केळ

 केळ्यामध्ये पोटॅशियम घटक मुबलक असल्याने रक्तदाबाची समस्यादेखील आटोक्यात ठेवण्यास मदत होते. केळ्यात नैसर्गिक स्वरूपात अ‍ॅन्टासिड असल्याने पोटाचे अनेक विकार आटोक्यात राहतात. तात्काळ एनर्जी मिळते. केळ्यात फायबर घटकही असल्याने बद्धकोष्ठता, बाऊल मुव्हमेंट सारख्या समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
केळ्याप्रमाणेच त्याची सालदेखील आरोग्यदायी आहे. दातांचे आरोग्य जपण्यासाठी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी केळ्याची साल फायदेशीर ठरते. मग इतके फायदेशीर केळ रात्रीच्या वेळी  खाऊ नये असे का म्हणतात ?

 रात्री केळं खाणं खरंच त्रासदायक ठरते का ?

केळं हे थंड प्रकृत्तीचं असल्याने अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळेस केळं खाऊ नका असा सल्ला देतात. अनेकदा त्याच्या सेवनामुळे सर्दी,खोकल्याचा त्रास होत असल्याचे वाटते. मात्र एक्सपर्ट्च्या सल्ल्यानुसार, रात्रीच्या वेळेसही खाऊ शकता. शकता.मात्र केळं पचण्यासाठी जास्त वेळ घेत असल्याने झोपण्यापूर्वी किमान 2-3 तास आधी केळं खाणं अधिक फायदेशीर आहे.

 सर्दी खोकल्याचा धोका ?

तुम्हांला सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर मात्र केळ्याप्रमाणेच इतर कोणतेही आंबट फळ खाण्यापासून दूर राहणं गरजेचे आहे. रात्री झोपायला जाताना शरीराचे मेटॅबॉलिझम कमी होते. शरीर रेस्ट मोडमध्ये जाते. अशावेळेस काही खाल्ल्यास आरोग्याला त्रासदायक ठरते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top