Personal Loan : बरेच वेळा अचानक पैश्यांची गरज पडल्यास लोक कर्ज काढत असतात. पण बहुतेक बँकांचे व्याजदर जास्त असते. त्यामुळे कर्ज घेणे सर्वांना परवडत नाही. तसेच अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज काढत असतात.
बँकेकडून कर्ज मिळवल्या नंतर तुम्ही त्याची वेळेवर नियमितपणे परत फेड करून तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला बनवू शकता. अनेक बँका वैयक्तिक कर्ज सुविधा देत आहेत. त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते.
तर बरेच लोक बँकांचे व्याजदर अधिक असल्याने कर्ज घेणे टाळतात. मात्र आता खालील बँक कमी व्याजदराने ग्राहकांना Personal Loan देत आहे. यामुळे ग्राहकांचे व्याज म्हणून जाणारे पैसे वाचणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र
या बँकेतील Personal Loan वरील प्रारंभिक व्याज दर 9.25 टक्के आहे. 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज बँकेत दिले जाऊ शकते. या बँकेत कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.
फेडरल बँक
फेडरल बँक ही खाजगी बँके आहे. या बँकेचा Personal Loan वर 10.49 टक्के ते 17.99 टक्के व्याजदर आहे. बँकेत 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. कर्जाचा कालावधी 48 महिन्यांचा असेल
पंजाब नॅशनल बँक (PNB)
देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB Personal Loan वर 10.15 टक्के ते 16.70 टक्के व्याजदर आहे. बँकेतील कर्जाची रक्कम 10 लाखांपर्यंत आहे. बँकेतील वैयक्तिक कर्जाचा कालावधी 60 महिन्यांपर्यंत असतो.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियामध्ये Personal Loan वरील व्याज दर 9.10 टक्क्यांपासून सुरू होतो. 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज बँकेत उपलब्ध असेल. बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.
IDBI Bank
या बँकेचा Personal Loan वर 10.25 टक्के ते 15.50 टक्के व्याजदर आहे. व्याजाचा कालावधी 12 ते 60 महिन्यांचा राहील.
IDFC फर्स्ट बँक
या खाजगी बँकेत Personal Loan वर 10.49 टक्के व्याजदर आहे. या बँकेतील कर्जाचा कालावधी 6 ते 60 महिन्यांचा असेल. कर्जाची रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत आहे.