Top 5 Credit Card List: मोठ्या शहरांमध्ये रोजच्या व्यवहारांपासून ऑनलाइन खरेदीपर्यंत क्रेडिट कार्डची गरज वेगाने वाढली आहे. अनेक लोक अजूनही क्रेडिट कार्ड घेण्याबाबत साशंक असतात, तर काहींचा अर्धा महिनाच क्रेडिट कार्डवर चालतो. अशा दोन्ही प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी काही क्रेडिट कार्ड उत्तम पर्याय ठरू शकतात.
पहिलं किंवा नवीन क्रेडिट कार्ड हवंय? हे 5 पर्याय सर्वोत्तम
जर तुम्ही पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेणार असाल किंवा कमी खर्चात चांगल्या सुविधांसह कार्ड शोधत असाल, तर पुढील कार्डे योग्य पर्याय आहेत. या सर्व कार्डांचे वार्षिक शुल्क 1,000 रुपयांपेक्षा कमी असून फीचर्सही आकर्षक आहेत.
1,000 रुपयांखाली वार्षिक शुल्क असलेली टॉप क्रेडिट कार्ड
Amazon Pay ICICI Credit Card
- वार्षिक शुल्क: ₹0 (लाइफटाइम फ्री)
- शुल्क माफी: लागू नाही
- मुख्य फायदे: 1.99% कमी विदेशी व्यवहार शुल्क, अमर्यादित रिवॉर्ड पॉइंट्स, पॉइंट्सला एक्सपायरी नाही
Flipkart Axis Bank Credit Card
- वार्षिक शुल्क: ₹500
- शुल्क माफी: दुसऱ्या वर्षी (₹3.5 लाख वार्षिक खर्चावर)
- मुख्य फायदे: मिंत्रावर 7.5% कॅशबॅक (तिमाही ₹4,000 मर्यादा), पेट्रोलवर 1% अधिभार सूट
SBI Cashback Credit Card
- वार्षिक शुल्क: ₹999 + कर
- शुल्क माफी: ₹2 लाख वार्षिक खर्चावर
- मुख्य फायदे: ऑनलाइन खर्चावर 5% कॅशबॅक, ऑफलाइनवर 1% कॅशबॅक
IDFC First Millennia Credit Card
- वार्षिक शुल्क: ₹0 (लाइफटाइम फ्री)
- शुल्क माफी: लागू नाही
- मुख्य फायदे: कोणतेही जॉइनिंग/वार्षिक शुल्क नाही
Axis Bank ACE Credit Card
- वार्षिक शुल्क: ₹499
- शुल्क माफी: दुसऱ्या वर्षी (₹2 लाख वार्षिक खर्चावर)
- मुख्य फायदे: बिल पेमेंटवर 5% कॅशबॅक, वर्षाला 4 मोफत लाउंज भेटी
HDFC MoneyBack+ Credit Card
- वार्षिक शुल्क: ₹500 + कर
- शुल्क माफी: ₹50,000 वार्षिक खर्चावर
- मुख्य फायदे: Amazon, Flipkart, Swiggy, Reliance Smart, BigBasketवर 10X कॅशपॉइंट्स, इतर व्यवहारांवर ₹150 मागे 2 कॅशपॉइंट्स
कोणते कार्ड सर्वात फायदेशीर?
या सर्व पर्यायांमध्ये Amazon Pay ICICI Credit Card हे सर्वोत्तम ठरते. याची मुख्य कारणे:
- पूर्णपणे लाइफटाइम फ्री
- रिवॉर्ड पॉइंट्सची कोणतीही मर्यादा नाही
- पॉइंट्स कधीही एक्सपायर होत नाहीत
- विदेशी व्यवहार शुल्क फक्त 1.99%
आंतरराष्ट्रीय व्यवहार करणारे, तसेच रोजच्या ऑनलाइन खरेदीसाठी जास्त फायदा शोधणारे ग्राहक या कार्डाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेऊ शकतात.

