Property News: प्रॉपर्टी बाबत तुम्ही रेंट आणि लीज हे दोन शब्द नक्कीच ऐकले असतील. हे दोन्ही भाडेतत्वाचे प्रकार आहेत पण तरीही यामध्ये मोठा फरक आहे. सर्वात मोठा म्हणजे लीज त्या प्रॉपर्टीला दिली जाते ज्याचा वापर दीर्घ काळासाठी केला जाणार आहे.
रेंटल प्रॉपर्टीजची आवश्यकता दीर्घकाळासाठी देखील असू शकते किंवा नसते देखील. यासाठी रेंट एग्रीमेंट सामान्यतः कमी कालावधीसाठी होतो. हे 11 महिने पुन्हा रिन्यू करावे लागते. तर लीज अनेक वर्षांसाठी असू शकतो.
लीज एकाच वेळी जास्तीत जास्त काळ 99 वर्षांसाठी करता येते. यानंतर ती पुन्हा 99 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. परंतु अनेकदा हे लीज मधील अटींवर अवलंबून असते कि प्रॉपर्टीची देखरेख कोण ठेवेल. तर रेंटल प्रॉपर्टीची देखरेख प्रॉपर्टीचा मालकाकडे असते. त्यामुळे त्यांना मेंटेनन्स दिला जातो.
लीज आणि रेंट मध्ये अजून काय फरक आहेत
लीज समाप्त होई पर्यंत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केले जाऊ शकत नाहीत. यामध्ये लीजच्या टर्म पर्यंत लीज घेणारा व्यक्ती या प्रॉपर्टीचा स्वामी होतो. जर लीज रजिस्टर नसेल तर ती 12 महिन्याच्या आत अमान्य होते. तर रेंटल प्रॉपर्टी मध्ये मालक हा प्रॉपर्टी रेंटवर देणाराच राहतो.
रेंटल एग्रीमेंट मध्ये मालक कधीही बदल करू शकतो. जर रजिस्टर केले नाही तरी देखील रेंटल एग्रीमेंट कायदेशीर ग्राह्य असतो. लीज मध्ये लीज घेणाऱ्याला (भाडेकरी) ती प्रॉपर्टी खरेदी करण्याची ऑफर मिळू शकते. तो बाकी पैसे देऊन प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. तर रेंटल प्रॉपर्टी मध्ये असे काहीही नसते.
फायदेशीर काय
जर तुम्ही घर किंवा अपार्टमेंट राहण्यासाठी घेत असाल ज्याचे भाडे दरमहिन्याला देऊ इच्छिता तर तुमच्यासाठी रेंट एग्रीमेंट जास्त चांगले राहील. यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स इत्यादींची काळजी राहणार नाही. परंतु जर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी घेण्याचा किंवा दीर्घकाळ प्रॉपर्टी वापरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लीज केले पाहिजे. ज्यामुळे तुम्ही वेळोवेळी कॉन्ट्रेक्ट रिन्यू करण्याच्या त्रासातून मुक्त राहाल आणि आपले लक्ष काम करण्यावर केंद्रित करू शकता. लीज मध्ये एकरकमी पैसे जातात त्यामुळे हे आर्थिक दृष्ट्या किती अफोर्ड करू शकता याचा विचार केला पाहिजे.