PPF : तुम्ही पब्लिक प्रॉविडेंट फंडशी जोडलेले एकच खाते एका व्यक्तीच्या नावाने उघडू शकता. तर FD, RD अनेक वेळा उघडता येते. त्याचे फक्त एक खाते वैध आहे.
पीपीएफमध्ये, तुम्ही बचत खाते, आरडी खाते यासारखे संयुक्त खाते उघडू शकत नाही. यामध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या नावाने खाते उघडले जाते. यामध्ये कोणालातरी नॉमिनी बनवणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.
इतर योजनांच्या तुलनेत तुम्हाला PPF मध्ये ७.१ टक्के व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६ टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८ टक्के, महिला सन्मान बचत पत्रावर ७.५ टक्के व्याज मिळत आहे.

एकदा तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली की तुम्हाला 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. ती इतर योजनांसारखी नाही. इतर योजनांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार १, २, ३, ५, १० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.
अनिवासी भारतीयांना पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. खात्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही NRI झालात तर तुम्ही तुमचे खाते सुरू ठेवू शकता.