PM Kisan: सध्या देशातील करोडो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ही योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत पुढील म्हणजे 15वा हप्ता केंद्र सरकार कधीही जाहीर करू शकते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ वा हप्ता पाठवला गेला आहे. आत्तापर्यंत केंद्र सरकार पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६,००० रुपये पाठवत आहे.
मात्र सरकार आता ते 8 हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते, अशा बातम्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. मात्र, या वृत्ताला सरकारने अद्याप अधिकृत केले नाही. पीएम किसान योजनेतील रक्कम 8 हजार रुपयांपर्यंत वाढल्यास दर 3 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये पाठवले जातील. या योजनेसाठी कोण पात्र आहेत?
ज्यांच्या नावे शेतीयोग्य जमीन आहे ते पीएम-किसान योजनेंतर्गत पात्र आहेत. यामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याला सरकारी नोकरी नसावी.
तुमच्या स्वतःच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना याचा लाभ घेता येणार नाही. ज्या लोकांचे उत्पन्न दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे ते याचा लाभ घेऊ शकत नाहीत.
याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही ते हप्त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीत. ज्यांच्याकडे ई-केवायसी नाही त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार नाहीत, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. म्हणजेच ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत येऊ शकतो. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.