PM Kisan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भाई दूजच्या मुहूर्तावर आज 15 नोव्हेंबर रोजी सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे.
यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दरमहा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवत आहे.
झारखंडमधील खुंटी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटण दाबून हा हप्ता हस्तांतरित केला. या योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे.
#WATCH | Khunti, Jharkhand: Prime Minister Narendra Modi releases the 15th instalment amount of about Rs. 18,000 crores under PM-KISAN. pic.twitter.com/xYkLa6J14M
— ANI (@ANI) November 15, 2023
कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती हवी असल्यास तुम्ही [email protected] वर ईमेल पाठवू शकता . यासोबतच १५५२६१ किंवा १८००११५५२६ या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
यामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो
जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात पाठवले जाणार नाहीत. याशिवाय, अर्जामध्ये लिंग चूक, नावाची चूक, आधार क्रमांक इत्यादींमध्ये कोणतीही चूक आढळल्यास, तरीही हप्त्याचे पैसे सरकार पाठवले जाणार नाहीत.