PM Kisan: होळीपूर्वी करोडो शेतकऱ्यांना मिळाले गिफ्ट, सरकारने दिली माहिती, ऐकून शेतकरी खूश!

Pm Kisan Scheme Status: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm kisan scheme) च्या १३व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे.

PM Kisan Scheme 13th Installment Date 2023 : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm kisan scheme) च्या १३व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm kisan scheme) हप्त्याचे पैसे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत, म्हणजेच यावेळी सरकार 14 कोटी शेतकऱ्यांना होळीच्या दिवशी गिफ्ट देणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी केंद्र सरकारने आणखी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.

पैसे कधी येणार?

पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 8 मार्च रोजी खात्यात येऊ शकतो, सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे मानले जात आहे की सरकार शेतकऱ्यांना होळीच्या सणाचे मोठे गिफ्ट देऊ शकते.

विमा योजनेच्या ऑफिशियल ट्वीट वर मिळाली माहिती

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, आतापासून कोणत्याही शेतकऱ्याला भाषेच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. पीक विम्याच्या मार्गात शेतकऱ्यांना कोणतेही अडथळे येणार नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रधानमंत्री फसल विमा योजना घेते. पीक विमा अॅप आणि एनसीआय पोर्टलवर शेतकरी हिंदी, इंग्रजीसह १२ प्रादेशिक भाषांमध्ये पीक विमा संबंधित माहिती मिळवू शकतात.

12 हप्ते देण्यात आले आहेत

आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे 12 हप्ते देण्यात आले आहेत. आता सर्व शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप EKYC केले नसेल, तर ते त्वरित करा, अन्यथा 13 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.

तुमच्या हप्त्याचे स्टेटस असे चेक करा-

– हप्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

– आता Farmers Corner वर क्लिक करा.

– आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

– आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

– येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

– यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

Follow us on

Sharing Is Caring: